ASG-Eye-Hospital
ASG-Eye-Hospital 
पुणे

एएसजी आय हॉस्पिटलची शाखा पुण्यात सुरू

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘एएसजी सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल’ची महाराष्ट्रातील पहिली शाखा रविवारी पुण्यात सुरू झाली. ‘एएसजी’ची १३ राज्यांतील २३ शहरांमध्ये २७ रुग्णालये कार्यरत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अचूक निदान आणि योग्य, प्रभावी उपचार हे ‘एएसजी आय हॉस्पिटल’चे वैशिष्ट्य आहे. पुण्यातील रुग्णालय फर्ग्युसन रस्त्यावरील पोलिस मैदानाजवळील सेलो प्लाटिना येथे सुरू झाले आहे.

‘एएसजी आय हॉस्पिटल’ ही नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयातील अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्‍टरांनी एकत्र येऊन स्थापन केलेली रुग्णालयांची साखळी आहे.  डोळ्यांशी निगडित सर्व आजार, जटिल शस्त्रक्रिया, निदान, उपचार पुणेकरांना या हॉस्पिटलमध्ये एकाच ठिकाणी मिळतील. डॉ. नीतेश साळुंखे, डॉ. मुकेश पाटील, डॉ. दिव्या सिंग-पाटील, डॉ. आकाश यादव हे डॉक्‍टर येथे आहेत.

डॉ. मुकेश पाटील म्हणाले,  ‘‘नवीन फेको इमल्सिफिकेशन्समध्ये कुठलेही इंजेक्‍शन, टाके, पट्टी न वापरता शस्त्रक्रिया करून मोतीबिंदूवर इलाज होऊ शकतो.’’

डॉ. दिव्या सिंग पाटील म्हणाल्या, ‘‘व्हेव फ्रंटचे प्रगत तंत्रज्ञान वापरून सर्व प्रकारच्या चष्म्यांचे नंबर काढले जाऊ शकतात. यामुळे रुग्ण वेदनेविना काही मिनिटांमध्ये चष्मा, लेन्समुक्त होऊ शकतो.’’ डॉ. नीतेश साळुंखे म्हणाले, ‘‘रेटिनासाठी २५ जी आणि २७ जी ही टाकेरहित व्हिक्‍टोरोमी शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. मधुमेह, हायपर टेन्शन रुग्णांचा रेटिना तपासणे आवश्‍यक आहे.’’

डोळ्यांतून पाणी येण्याची समस्या असलेल्या मुलांची तपासणी करणे अत्यंत आवश्‍यक असते. वेळेवरील उपचारांद्वारे ही समस्या दूर करता येते.
- डॉ. आकाश यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT