वृक्षारोपणाचे प्रयोजन आहे
वृक्षारोपणाचे प्रयोजन आहे sakal
पुणे

Ashadhi Wari 2023 : वारीच्या वाटेवर वृक्षारोपणाचा जागर

सकाळ वृत्तसेवा

फलटण : उन्हाच्या झळा, घामाने डबडबलेले वारकरी, विसाव्याला उसंत घ्यावी तर बसायला झाडे नाही. रस्ता मोठा झाला पण सावली देणारी झाडे नसल्याने वारकऱ्यांना विसाव्यातही उन्हाचा चटका सोसावा लागत आहे. ‘वृक्ष का हवेत?’ याचे उत्तर वारकऱ्यांइतके आता कोणीच सांगू शकत नाही.

त्यामुळे प्रत्येक वारकऱ्याने वृक्षारोपणाचा वसा निश्चित घेतला असेल. याच पोटतिडकीने, ‘माझ्या माहेरची, या पंढरीची वाट, झाडं पिंपळ- वडाची, लाडकी लेक मी संतांची, मज वरी कृपा बहुतांची...असा संदेश आपल्या भारुडातून चंदाताई तिवाडी देत होत्या.

पालखी मार्गाचे चौपदरीकरण झाले. त्यामुळे वारकऱ्यांना चालायला प्रशस्त जागा झाली. दुसऱ्या बाजूने दिंड्यांची वाहने लवकर निघत आहेत. मात्र, रुंदीकरणामुळे मार्गावरील झाडे गायब झाल्याने माउलींच्या सोहळ्यातील वारकऱ्यांना न्याहारी, दुपारचे जेवण व विसावा उन्हाच्या झळांमध्ये करावा लागत आहे. पावसासाठी आणलेल्या छत्र्यांचा उपयोग उन्हापासून संरक्षणासाठी होत आहे.

आळंदी-पंढरपूर आणि देहू-पंढरपूर या मार्गांवर वृक्षारोपणाचे प्रयोजन आहे. त्यासाठी सामाजिक संस्था, संघटना आणि प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. सरकार वृक्ष लागवड करेल पण त्याच्या संवर्धनाचे काम स्थानिक ग्रामस्थांना, संस्थांना करावे लागणार आहे. आगामी काळातील वारीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण अत्यावश्यक आहे.

चित्ररथाद्वारे प्रबोधन

वारीत प्रशासनासह अन्य यंत्रणा जनप्रबोधनाचे काम करत आहेत. निरनिराळ्या विभागांचे चित्ररथ वारीच्या मार्गावर दिसत आहेत. शासनाचे निरनिराळे विभाग वारीच्या वाटेवर प्रबोधन करत आहेत. चित्ररथांद्वारे प्रबोधन केले जात आहे. पथनाट्ये ऐकू येत आहेत.

वृक्षांबाबत भारुडातून प्रबोधन

माझ्या माहेराची ओढं, काय सांगू तुला बाई....माझ्या अंगणात बाई फुलल्या गं जाईजुई, घाली मायेची पाखरं, मायाळू गं माझी आई, या गं प्रेमाचे हे वारे, वाहतसे झुळूझुळू, माझा थोरला चुलता बाई दारीचा पिंपळं... हे भारुडकार चंदाताई तिवाडी यांच्या भारुडातील झाडांशी असलेले नाते वारकऱ्यांना भावत होते.

लक्षवेधी उपक्रम

महाराष्ट राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणाबाबत जागृती करणारी पथनाट्य

कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माउली वाबळे यांचे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ यावर प्रबोधन सुरू होते. त्यानंतर चंदाताईंनी प्लॅस्टिकमुक्ती आणि नदीप्रदूषणावर भारुडातून जनजागरण केले.

शाहीर देवानंद माळी यांनी वगनाट्याच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन व पर्यावरण रक्षणाबाबत प्रबोधन सुरू होते. सिंगल युज प्लॅस्टिक बंद करा, कापडी पिशवी वापरण्याचा संदेश

सामाजिक न्याय विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यातर्फे संविधान दिंडीचा चित्ररथ

गो विज्ञान संशोधन संस्थेच्या वतीने ‘मधमाशी पाळा, मधमाशी वाचवा’ हे अभियान वारीत सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी चित्ररथाद्वारे प्रबोधन

महाएनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून वारकरी सेवा रथ वारीच्या वाटेवर आहे. त्यामध्ये गो संवर्धन, शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार, वृक्ष व जलसंवर्धन सेवा कीर्तन, प्रवचन सुरू

पालखी मार्गावर पावसाळ्यात जुलैमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. प्रामुख्याने देशी झाडे लावण्यात येणार असून, त्यामध्ये वड, पिंपळ, उंबर, लिंब यांचा समावेश असेल

- केशव घोडके, प्रकल्प संचालक, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग

वृक्षारोपण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. संस्थानच्या वतीने काही स्वयंसेवी संस्थांच्या वतीने पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

- अॅड. विकास ढगे, सोहळाप्रमुख, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

रस्त्याच्या दोन्ही बाजूला सरकारच्या वतीने वृक्षारोपण होणार आहे. त्याचा पाठपुरावा देहू संस्थानच्या वतीने करण्यात येईल.

- पुरुषोत्तम महाराज मोरे, अध्यक्ष, संत तुकाराम महाराज संस्थान

वारीत चालताना वारकरी कशाचा विचार करीत नाही. मात्र, विसाव्याच्या वेळी किमान झाडाची सावली मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे अधिकाधिक वृक्ष लागवड आणि त्याचे संगोपन अत्यंत गरजेचे आहे.

- सखाराम आवाडे, वारकरी, बीड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT