Ashadhi Wari 2024 sakal
पुणे

Ashadhi Wari 2024 : भजनात दंग, वैष्णवांनी गाठले वरवंड;‘ज्ञानोबा-तुकारामा’चा जयघोष

गावातील मंदिराभोवती जमलेली भाविकांची गर्दी, मंदिराच्या मागे सूर्य मावळतीला पोहोचलेला, निरभ्र आकाश आणि पक्षी घरट्याकडे परतत होते. ‘ज्ञानोबा तुकाराम’ भजनात दंग होत पालखी‌ तळावर पोचली आणि भाविकांनी हात उंचावून ‘तुकाराम तुकाराम’ जयघोष केला. ग्रामस्थांनी रथातून पालखी खांद्यावर घेऊन मंदिरात आणली.

सकाळ वृत्तसेवा

वरवंड (जि.पुणे) : गावातील मंदिराभोवती जमलेली भाविकांची गर्दी, मंदिराच्या मागे सूर्य मावळतीला पोहोचलेला, निरभ्र आकाश आणि पक्षी घरट्याकडे परतत होते. ‘ज्ञानोबा तुकाराम’ भजनात दंग होत पालखी‌ तळावर पोचली आणि भाविकांनी हात उंचावून ‘तुकाराम तुकाराम’ जयघोष केला. ग्रामस्थांनी रथातून पालखी खांद्यावर घेऊन मंदिरात आणली.

वारीच्या परंपरेचा अभंग होऊन संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांची आरती झाली. भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वरवंड गावात मुक्कामी विसावला. ‘हरिभक्त माझे जिवलग सोइरे । हृदयीं पाउले धरिन त्यांचे ॥’, या विचारातून पालखीची वाटचाल झाली. चोपदार नामदेव गिराम काका यांच्या सूचनेनुसार समाज आरतीसाठी रथापुढील २७ दिंड्या तळावर पोचल्या. ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेतल्यानंतर जयघोष सुरू झाला. ‘ही माझी मिराशी’ हा अभंग घेतला. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची आरती झाली. रात्री कानसूरकर दिंडीचे कीर्तन व म्हातारबाबा दिंडीतर्फे जागर झाला.

ऊन-सावल्यांचा खेळात वाट सरली

यवत मुक्कामी सकाळी साडेसहा वाजता तुकोबांच्या पादुकांना अभिषेक सुरू असताना बाहेर पावसाचा शिडकावा सुरू होता. पोपट तांबे यांनी शिंग वाजवून पालखी निघत असल्याचा इशारा दिला. त्यानुसार सेवेकरी, मानकरी, विणेकरी सोबत आले. ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन महामार्गालगत उभ्या असलेल्या रथात ठेवली आणि सोहळा आठ वाजता वरवंडकडे मार्गस्थ झाला. ढगाळ वातावरणामुळे ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता.

भांडगाव ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन श्रीविठ्ठल मंदिरात दुपारच्या विसाव्यासाठी आणली. पिठलं भाकरीचा महाप्रसाद होता. भांडगावातून निघून चौफुला येथे विसावा घेऊन सायंकाळी सोहळा वरवंडमध्ये पोहचला. आजची वाटचाल १४ किलोमीटरची होती. उन्हाची तीव्रता असूनही वाऱ्याची झुळूक दिलासा देत होती, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT