Ashadhi Wari sakal
पुणे

Ashadhi Wari : पालखीच्या आगमनानंतर पूर्व हवेलीत जल्लोष

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे मंगळवारी (ता. २) पूर्व हवेलीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. याठिकाणी प्रवेश केल्यानंतर कवडीपाट येथे गटविकास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे व हवेलीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी यांनी पालखीचे स्वागत केले.

सकाळ वृत्तसेवा

उरुळी कांचन : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे मंगळवारी (ता. २) पूर्व हवेलीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. याठिकाणी प्रवेश केल्यानंतर कवडीपाट येथे गटविकास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे व हवेलीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी एकूण १२५ दिंड्या सोहळ्यात सहभागी झाल्याची माहिती सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे व अजित महाराज मोरे यांनी दिली.

सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा लोणी काळभोर येथील पालखीतळावर दाखल झाला. त्यानंतर लोणी काळभोरच्या सरपंच सविता लांडगे, कदमवाकवस्ती सरपंच चित्तरंजन गायकवाड, उपसरपंच नासिर पठाण यांच्या हस्ते महाआरती पार पडली.

यावेळी उपसरपंच शीतल काळभोर, ग्रामविकास अधिकारी एस. एन. गवारी यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार मित्र मंडळ, ज्येष्ठ नेते माधव काळभोर, विलास काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, कॉंग्रेसचे शिवदास काळभोर, जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार, पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर, माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर, संघटक श्रद्धा कदम, शहर प्रमुख संतोष भोसले, जिल्हा संघटक नीलेश काळभोर यांच्यावतीने पालखीचे स्वागत केले.

याप्रसंगी पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूलचे ढोल-लेझीम पथक तर, कन्याप्रशाळेच्या विद्यार्थिनींची वृक्षदिंडी होती. महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांनी दहा हजार वारकऱ्यांना फराळ व थंडपेय वाटप केले. यावेळी वारकऱ्यांसाठी अन्नसेवेचे आयोजन, मोफत आरोग्य शिबिर तसेच ओला व सुका कचरा वेगळा करून गावात कचरा होणार नाही याचे नियोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandoli National Park : चांदोली जंगलात वाघांचे अस्तित्व वाढले; गवे, डुकरं बदलताहेत अधिवास, वनविभाग कोणतं पाऊल उचलणार?

Babar Azam घरगुती वाघ! PSL मध्ये शतक झळकावून केली विराट कोहली, अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी; रोहितला मागे सोडले

Mumbai News: वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी वाईट बातमी! ‘वन नेशन, वन ई-चालान’ महाराष्ट्रात लागू; नियमभंग केला तर थेट दंड

कुर्डुवाडीच्या प्रियांतिकाची सिनेसृष्टीत दमदार एंट्री! ‘फुला’ चित्रपटातून मांडली मुरळीच्या जगण्याची वेदना; चित्रपटाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर अमर देवकर बार्शीचे, वाचा...

ICSE and ISC Result : ‘आयसीएसई’चा ९९.१८ टक्के, तर ‘आयएससी’चा ९९.१३ टक्के निकाल; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT