dehu temple sakal
पुणे

Sant Tukaram Maharaj Palkhi : तुकाराम महाराज यांच्या पालखीचे उद्या प्रस्थान; मुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थित

आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी (ता. २८) दुपारी अडीच वाजता देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

देहू - आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी (ता. २८) दुपारी अडीच वाजता देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. देहूत पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आणि भाविक दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी देहूनगरीतील ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.

इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलून गेला आहे. मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी होत आहे. देहूतील विविध संस्था आणि ग्रामस्थांच्या वतीने अन्नदानासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. पालखी मार्गावर जागोजागी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. संत तुकाराम महाराज संस्थान, देहू नगरपंचायत प्रशासन आणि देहूरोड पोलिसांनी पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांनी सांगितले की, ‘‘यंदा पालखी सोहळा प्रस्थान कार्यक्रम शुक्रवारी दुपारी अडीच वाजता मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपातून सुरू होईल. संस्थानच्या वतीने संपूर्ण तयारी केली आहे.

नामदेव महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

हिंगोली - ‘जय जय राम कृष्ण हरी’ च्या गजरात संत नामदेव महाराजांच्या पालखीचे नर्सी नामदेव (ता. हिंगोली) येथून बुधवारी दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या पालखी सोहळ्यात शेकडो वारकरी सहभागी झाले आहेत. गावात नगरप्रदक्षिणेनंतर पालखी नामदेव मंदिरात मुक्कामी थांबली. संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ नर्सी येथून गेल्या २९ वर्षांपासून पालखी सोहळा पंढरपूर यात्रेसाठी रवाना होतो. टाळ -मृदंगाच्या ठेक्यावर ‘रामकृष्ण हरी’ चा गजर करीत पालखी गावातील मुख्य मार्गाने नगरप्रदक्षिणा करत निघाली. जागोजागी रांगोळी काढून पालखीचे स्वागत करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT