Ashadi Wari 2022 warkari devotee of vitthal going to meet pandurang after two year Palkhi
Ashadi Wari 2022 warkari devotee of vitthal going to meet pandurang after two year Palkhi  sakal
पुणे

Ashadi Wari 2022 : वैष्णवांच्या भक्तिने शहारला दिवे घाट

विलास काटे

सासवड : खांद्यावरील फडफडणाऱ्या भगव्या पताका...टाळमृदंगाचा गजर...माऊलीनामाचा अखंड जयघोष...अमाप उत्साह...अशा अल्हाददायक वातावरणात अवघड दिवे घाटाचा टप्पा असंख्य पावलांनी लीलया पार केला. दोन वर्षांच्या खंडानंतर आलेल्या वैष्णवांच्या मांदियाळीला डोळ्यात साठविण्यासाठी लाखो भाविकांनी दिवेघाटमाथ्यावर दाटी केली होती. वडकीनाल्याजवळ पावसाच्या अभिषेकाने सोहळा सुखावला. सुमारे ३२ किलोमीटरचे अंतर पार करून माऊलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी सासवडला विसावला. पुणेकरांचा दोन दिवसांचा पाहुणचार स्वीकारून माऊलींचा पालखी सोहळा सकाळी सहा वाजता सासवडकडे मार्गस्थ झाला. त्यापूर्वी पहाटे माऊलींच्या पादुकांना प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. सोहळा वानवडी येथील शिंदेछत्री येथे आल्यानंतर आरती करण्यात आली.

त्यानंतर सोहळा साडेआठ वाजता हडपसरला न्याहारीसाठी विसावला. दरम्यान भैरोबा नाला ते गाडीतळ या मार्गावरून एका बाजूने दिंडीतील वारकरी आणि दुसऱ्या बाजूला पुणेकर तरुणाई, अबालवृद्धांची पायी गर्दी असे मनोहरी दृश्य वारीचा आनंद देऊन जात होता. पुढे उरुळी देवाची, फुरसुंगी, वडकी नाला येथे ग्रामस्थांनी सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. आज एकादशी असल्याने ठिकठिकाणी वारकऱ्यांनी फराळाचे पदार्थ, तसेच बिस्किटे, दूध, पाणी वाटप करण्यात पुणेकर दंग होते. सोहळा वडकीनाल्यामध्ये आल्यानंतर जलधारा बरसू लागल्या. त्यात अवघा सोहळा चिंब झाला. वडकीत सोहळा आल्यानंतर माऊलींच्या रथाला चार बैलजोड्या लावण्यात आल्या. घाटातील अवघड वळणाची वाट, देहभान विसरून चालणाऱ्या वारकऱ्यांची गर्दीचे मनोहरी दृश्य अनेकांनी कॅमेऱ्यात कैद केले. घाट पार करून सोहळा आल्यावर झेंडेवाडी येथे विसावा घेतला. त्यानंतर सोहळा सासवड मुक्कामी विसावला.

सुप्रिया सुळे घाटात चालल्या...

महाविकास आघाडीच्या सत्तेच्या अनिश्चिततेची टांगती तलवार राष्ट्रवादी काँग्रेसवर असतानाही खासदार सुप्रिया सुळे या दिवे घाटात माऊलींच्या सोहळ्यात पायी चालल्या. वारकऱ्यांसोबत नामस्मरणाचा आनंद घेतला. तर झेंडेवाडीत स्वागतासाठी पुरंदरचे आमदार संजय जगताप होते.

कोरोनामुळे वारी खंडित झाली होती. यंदा पुन्हा यायला मिळाले, त्यात समाधान आहे. आता पुन्हा वारी परत चुकवू देऊ नये, हेच विठ्ठलाकडे मागणे आहे. वारीत चालण्याचा आनंद वर्षभर जगण्यासाठी बळ देतो.

- सावित्रीबाई खाडे, गाडेगुंडवाडी, कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarabhai Fame Actress Join BJP: 'साराभाई 'फेम अभिनेत्रीने हाती घेतला कमळ! विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन

Satara Lok Sabha : 'साताऱ्याचा खासदार शशिकांत शिंदेच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; जयंत पाटलांना विश्वास

Laptop Overheating : उन्हाळ्यात लॅपटॉप होतोय अधिक गरम? ब्लास्ट होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

Salman Khan: "टाइगर जिंदा है और..."; घरावरील गोळीबार प्रकरणानंतर भाईजान पोहोचला लंडनला, यूकेच्या खासदारांकडून फोटो शेअर

SCROLL FOR NEXT