संत तुकाराम महाराज यांचा पालखी  sakal
पुणे

Ashadi wari 2023 : बऱ्हाणपूरचा विसावा घेऊन सोहळा संध्याकाळी बारामतीत

शनिवारी रात्री उंडवडी मुक्कामी देशमुखांच्या वतीने कीर्तन झाले. तर जागर मसलेकर दिंडीच्या वतीने झाला.

राजेंद्रकृष्ण कापसे

बारामती : उंडवडी येथून सकाळी निघालेला सोहळा आज दुपारच्या विसाव्यासाठी बारामती जवळील बऱ्हाणपूर येथे विसावला. संध्याकाळी पालखी बारामातीत येणार आहे. विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरला निघालेल्या संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्याच्या वाटचालीचा आजचा नववा दिवस आहे. शनिवारी रात्री उंडवडी मुक्कामी देशमुखांच्या वतीने कीर्तन झाले. तर जागर मसलेकर दिंडीच्या वतीने झाला.

उंडवडीच्या माळरानावर पाहते गार वाऱ्याने सोहळ्याला लवकर जाग आली. ग्रामस्थांच्या वतीने पादुकांना अभिषेक करण्यात आला. चोपदारांनी सूचना करताच सोहळा बारामतीच्या दिशेने मार्गस्थ झाला. उंडवडीच्या पठारावर सोहळ्याने पहिला विसावा घेतला. तेथून सोहळा बऱ्हाणपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला.

सकाळी निघाल्या पासून उन्हाची तिरीप होती. बऱ्हाणपूर येथे दुपारच्या विसाव्यासाठी सोहळा बारा वाजता पोचला. त्यावेळी तर उन्हाची तीव्रता वाढली होती. संस्थांनच्या निर्णयानुसार सोहळा आज बऱ्हाणपूर गावात गेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी मुख्य रस्त्यावर मांडव उभारला होता. रांगोळ्या ने स्वागत केले. ग्रामस्थांचे नैवद्य व अभिषेक दरवर्षी प्रमाणे करण्यात आले. दुपारच्या भर उन्हात मातीच्या रानात जेवणाच्या पंगती सुरु होत्या. दुपारी जेवण केल्यानंतर थोडीशी विश्रांती घेत सोहळा बारमतीकडे चालू लागला. मोरेवाडी येथील विसावा घेत पालखी सोहळा संध्याकाळी बारामतीत शहरात प्रवेश करील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT