Ashadi Wari sakal
पुणे

Ashadi Wari : दुःखद घटना! विठ्ठलाच्या दर्शानासाठी निघालेल्या महिला वारकऱ्याचा वाटेतच मृत्यू...

Ahsadi Ekadashi : दिंडी क्रमांक २२ मधून पायी वारीत त्या सहभागी झाल्या होत्या. गेली पंधरा वर्षांपासून त्या पायी वारी करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Hadapsar: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी महिला कमल सोपानराव बोरकर (वय ६५) यांचे सोमवारी (ता.१५) अकलुज जवळील तोंडले-बोंडले गावी ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा, मुलगी व सून नातवंडे असा परिवार आहे.

मूळचे नारायणपूरचे असलेले बोरकर यांचे कुटुंब नोकरीनिमित्त हडपसर, पंधरानंबर येथे राहत आहे. त्या पालखी सोहळ्यातील सत्संग दिंडी क्रमांक २२ मधून पायी वारीत सहभागी झाल्या होत्या. गेली पंधरा वर्षांपासून त्या पायी वारी करीत आहेत.

येथील श्री गुरूदत्त भजनी मंडळाच्या त्या अध्यक्षा होत्या. विविध धार्मिक कार्यक्रमात त्यांचे भजनीमंडळ भजनसेवा देत आहे. दरवर्षी हडपसर येथील पालखी विसावास्थळी त्यांची भजनसेवा असते.

याही वर्षी येथे भजनसेवा देवून त्या दींडीसोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. एकादशीला दोन दिवस बाकी असतानाच त्यांचे निधन झाल्याने त्यांचे कुटुंब व सहकारी वारकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. हडपसर परिसरातील त्यांच्या सहकाऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली. प्रशांत बोरकर हे त्यांचे पुत्र होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT