निराधारांनी चाखली मनमुराद स्ट्रॉबेरी
निराधारांनी चाखली मनमुराद स्ट्रॉबेरी  sakal
पुणे

Pune News : अस्तित्व कलामंचच्या महोत्सवात निराधारांनी चाखली मनमुराद स्ट्रॉबेरी

कृष्णकांत कोबल

हडपसर- सामान्यांसाठी स्ट्रॉबेरी खायला मिळणे तसे दुरापास्तच, अस्तित्व कलामंचाने महोत्सवाद्वारे ही संकल्पना राबवून अनाथाश्रममातील चिमुकले व वृध्दाश्रमातील निराधार ज्येष्ठांना ही पर्वणी मिळवून दिली. त्यांनी ही स्ट्रॉबेरी खान्याचा मनमुराद आनंद घेत समाधान व्यक्त केले.

आस्तित्व कला मंच वेळोवेळी विविध उपक्रमाद्वारे वंचित घटकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरविण्याचे काम करीत असते. हडपसर परिसरातील अनाथ मुले व बांधकाम कामगारांची मुले व निरा ज्येष्ठांना संस्थेनी स्ट्रॉबेरी देवून त्यांना आनंद देण्याचे काम केले.

तुकाई टेकडी येथील शंभूराजे अनाथालय, वडकी येथील श्री परशुराम आबाजी जगताप अनुजाती प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळा, ठिकठिकाणचे लेबर कॅम्प, गंगा तारा वृद्धाश्रम आदी ठिकाणी संस्थेने स्ट्रॉबेरी मोहसत्व आयोजित केला होता.

अनाथांना स्ट्रॉबेरीचा खाण्याचा आनंद मिळावा म्हणून प्रगतशील शेतकरी सोमनाथ शिंदे यांनी ना नफा ना तोटा तत्त्वावर संस्थेला स्ट्रॉबेरी उपलब्ध करून दिली. संस्थेच्या सदस्या डॉ अश्विनी शेंडे यांनी ही संकल्पना मांडली.

सदस्य योगेश गोंधळे, अश्विनी सुपेकर, धनश्री कुलकर्णी यांच्यासह अविनाश कीर्ती, श्रीकृष्ण भिंगारे, सुरज कुदळे, प्रमोद अय्या, धीरज दरवडे, वैशाली वाघमारे, नीता तारु, क्रांती चटके, लक्ष्मी घुले, हेमांगी ठाकूर, अनिता कावरे, सोनाली मुसळे, शीतल परमार, काजल माने, श्रुतिका क्षीरसागर, विजय तारु यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT