Professor Association sakal
पुणे

Professor Association : सहायक प्राध्यापक नेमावेत ; नवप्राध्यापक संघटनेची मागणी,आंदोलनाचा इशारा

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मानधन वाढवून देण्यात यावे, कायम नियुक्तीदरम्यान या प्राध्यापकांचा अनुभव ग्राह्य धरावा, यांसह १ ऑक्टोबर २०१७च्या आकृतिबंधातील मंजूर पदांमधील सहायक प्राध्यापक नेमावेत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मानधन वाढवून देण्यात यावे, कायम नियुक्तीदरम्यान या प्राध्यापकांचा अनुभव ग्राह्य धरावा, यांसह १ ऑक्टोबर २०१७च्या आकृतिबंधातील मंजूर पदांमधील सहायक प्राध्यापक नेमावेत, शिक्षण संचालक यांची १०० टक्के पदभरती तत्काळ करावी, अशा मागण्या उच्च शिक्षण विभागाने मान्य कराव्यात; अन्यथा कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेच्या वतीने देण्यात आला.

सध्या राज्यात सहायक प्राध्यापकांच्या दोन हजार ८८ जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे. ऑक्टोबर २०१७ नंतर बऱ्याच विषयांची सर्व पदे सेवानिवृत्ती, आकस्मिक मृत्यू अशा कारणांमुळे रिक्त झालेली आहेत. राज्यात अकृषी महाविद्यालयांत जवळपास १२ ते १५ हजार सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. याशिवाय आठ ते दहा हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

गेल्या सहा वर्षांत ऑक्टोबर २०१७ च्या आकृतिबंधाला मंजुरी मिळत नाही हीसुद्धा शोकांतिका आहे, असे मत संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाथ्रीकर यांनी मांडले.

संघटनेच्या वतीने डॉ. पाथ्रीकर यांनी विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांना दिले.

नवप्राध्यापकांच्या मागण्या...

  • १ ऑक्टोबर २०१७च्या आकृतिबंधातील मंजूर पदांना मान्यता देणे

  • सहायक प्राध्यापक पदभरतीचे ना हरकत प्रमाणपत्र उच्च शिक्षण सहसंचालक स्तरावर देण्यात यावे

  • अकृषी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवरील बंदी तत्काळ उठवावी

  • प्रत्येक जिल्ह्यात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे किमान एक शासकीय महाविद्याल सुरू करावे

  • औरंगाबाद जिल्ह्यात अकृषी केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करण्याचा प्रस्ताव तत्काळ केंद्र सरकारकडे पाठवावा

  • तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार मानधन द्यावे १ ऑक्टोबर २०१७च्या आकृतिबंधातील मंजूर पदांना मान्यता देणे

  • सहायक प्राध्यापक पदभरतीचे ना हरकत प्रमाणपत्र उच्च शिक्षण सहसंचालक स्तरावर देण्यात यावे

  • अकृषी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवरील बंदी तत्काळ उठवावी

  • प्रत्येक जिल्ह्यात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे किमान एक शासकीय महाविद्याल सुरू करावे

  • औरंगाबाद जिल्ह्यात अकृषी केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करण्याचा प्रस्ताव तत्काळ केंद्र सरकारकडे पाठवावा

  • तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार मानधन द्यावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT