Daund Police Station Sakal
पुणे

स्वाभिमानीच्या पुणे जिल्हाध्यक्षावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांनी या बाबत माहिती दिली.

प्रफुल्ल भंडारी

दौंड : पुणे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कदम यांच्याविरूध्द अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (Atrocity) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरण कडून थकबाकीदार वीजग्राहकांचे विद्यूत साहित्य जप्त केल्याप्रकरणी आठ दिवसांपूर्वीच राजेंद्र कदम यांनी आंदोलन करून महावितरण प्रशासनाला जप्तीची कारवाई थांबविण्यास भाग पाडले होते. (Pune District Crime News)

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांनी या बाबत माहिती दिली. आदिवासी समाजातील एका पस्तीस वर्षीय विवाहितेने या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. १५ जानेवारी रोजी सदर महिला आलेगाव (ता. दौंड) येथील कदम वस्ती येथे राजाराम उर्फ राजेंद्र शिवाजी कदम यांच्या घराशेजारील गोठ्यात साफसफाईचे काम करून दौंड शहराकडे जाण्यासाठी निघाली होती.

त्यावेळी राजेंद्र कदम यांनी सदर महिलेस दौंड येथे न जाण्यास सांगितले परंतु महिलेने आग्रह केल्याने राजेंद्र कदम यांनी दोन चापटी मारून रबरी पाईपने पाठ आणि पोटरीवर मारले. त्याचबरोबर जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

राजेंद्र कदम यांनी सदर फिर्याद कोणाच्या तरी सांगण्यावरून राजकीय द्वेषापोटी दिल्याचे सांगत त्यात तथ्य नसल्याचा दावा केला. संघटनेच्या माध्यमातून शेतकर्यांची बाजू घेतल्यावर काही लोक अशा तक्रारी करून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा श्री. कदम यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TVK MLA Ban: टीव्हीके आमदाराला विधानसभेत प्रवेश बंदी; विश्वासदर्शक ठरावापूर्वी विजय सरकारला मोठा धक्का

Pune Nasrapur Case : नसरापूर अत्याचार प्रकरण : चिमुरडीच्या शरीरावर गंभीर जखमा, आरोपीची तपासात उडवाउडवीची उत्तरे; पोलिसांचा न्यायालयात मोठा खुलासा

Latest Marathi News Live Update : नीट पेपर फूट प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी मूळचा अहिल्यानगरमधील, दुसरा आरोपी पुण्यातला

Sangli Police : सांगली पोलिसांचा संतापजनक प्रकार! संशयित समजून दोघा चुलत भावांना विवस्त्र करून बेदम मारहाण, आमदार जयंत पाटलांनी केली विचारपूस

Bibvewadi Fire : बिबवेवाडीत भीषण आगीत मंडप साहित्याचे गोदाम भस्मसात; दोन ट्रकसह सात दुचाकी खाक, मोठी जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT