पुणे

उधारीवर माल न दिल्याने दुकानदारावर धारदार शस्त्राने वार

सकाळवृत्तसेवा

पुणे : दुकानदाराने किराणा माल उधारीवर देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने एकाने दुकानदारासह त्याच्या भावावर धारदार शस्त्राने वार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना हडपसरमधील गोसावी वस्तीमध्ये शुक्रवारी सायंकाळी सव्वासात वाजता घडली. 

लक्ष्मण गणेश रणशिंगे (वय 21, रा.गोसावी वस्ती कॅनॉलजवळ, हडपसर) याला अटक केली आहे. याप्रकरणी मुकेश उर्फ मुलाराम सोळंकी (वय 23, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोळंकी यांचे गोसावी वस्तीमधील कालव्याजवळ किराणा मालाचे दुकान आहे. फिर्यादी व त्यांचा भाऊ सहा मार्चला त्यांच्या दुकानामध्ये बसले होते. त्यावेळी रणशिंगे हा दुकानामध्ये आला. त्याने फिर्यादींकडे उधारीवर किराणा माल मागितला. मात्र, फिर्यादी यांनी किराणा माल देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने रणशिंगे याने त्याच्यासमवेत आणलेल्या धारदार शस्त्राने सोळंकी व त्याच्या भावावर वार केले.

या घटनेमध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक करुन जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT