Pune Crime  sakal
पुणे

Pune Crime : जादूटोण्यावरून ज्येष्ठाच्या खुनाचा प्रयत्न;दोन लाखांची सुपारी,सहकार पोलिसांकडून तिघांना अटक

ज्येष्ठ नागरिकावर शस्त्राने वार करण्याच्या प्रकरणात सहकारनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. संबंधित ज्येष्ठ नागरिक जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून दोन लाख रुपयांची सुपारी देऊन त्यांच्या खुनाचा कट रचण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ज्येष्ठ नागरिकावर शस्त्राने वार करण्याच्या प्रकरणात सहकारनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. संबंधित ज्येष्ठ नागरिक जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून दोन लाख रुपयांची सुपारी देऊन त्यांच्या खुनाचा कट रचण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.

सागर सतीश कुंभार (वय ४१), तौरस बाळू कारले (वय ४३, दोघेही रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी), सागर शशिकांत सोनार (वय ३२, रा. मोरे वस्ती, रांका ज्वेलर्समागे, पद्मावती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर सोनू पांडू होडे (वय ६७, रा. मोरे वस्ती, रांका ज्वेलर्समागे, पद्मावती) असे जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. होडे यांच्यावर १५ जून रोजी पद्मावती परिसरात तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते.

या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. सहकारनगर पोलिसांकडून मागील काही दिवसांपासून याबाबत तपास सुरू होता. दरम्यान, होडे यांच्यावर हल्ला करणारा आरोपी सागर कुंभार हा सुपर इंदिरानगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती सहकारनगर तपास पथकातील पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी कुंभारला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी सागर सोनार याच्या सांगण्यावरून होडे यांच्यावर हल्ला केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT