Teacher
Teacher Sakal
पुणे

दहावी-बारावीच्या शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के अनिवार्य

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील सर्व शाळांमध्ये (School) इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांची (Teacher) ५० टक्के उपस्थिती, तर दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे, असे आदेश प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत.राज्यात (विदर्भ वगळता) शाळांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मंगळवारपासून सुरू झाले आहे. (Attendance of 10th and 12th Class Teachers is 100 Percent Compulsory)

विदर्भातील शाळा २८ जूनपासून सुरू होणार आहेत. दरम्यान शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत शिक्षण संचालकांनी आदेश काढले आहे. यात प्राथमिक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांना १०० टक्के उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य असेल, असे स्पष्ट केले आहे.

सध्या इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकनाचे काम सुरू असून मर्यादित वेळेत निकाल घोषित करण्याचे बंधन आहे. त्यामुळे विदर्भासह संपूर्ण राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के असणे बंधनकारक आहे. दरम्यान मुंबई शहरातील शिक्षकांच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील उपस्थितीसाठी त्यांना लोकलद्वारे प्रवासाच्या सोयीबाबत राज्य सरकार स्तरावर सूचना दिल्या जातील, असे जगताप यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या तरी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ऑनलाइन व अन्य माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीतपणे सुरू राहील, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना जगताप यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT