पुणे

बीआरटी बस थांब्यांचे मजबुतीकरण

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - औंध-रावेत बीआरटी मार्गावरील बस थांब्यांजवळील डांबरीकरणाचा भाग उंच-सकल झाल्यामुळे बसची दरवाजे उघडता येत नव्हते. त्यामुळे या मार्गावरील सर्व ११ बस थांब्यांवरील २२ ठिकाणांचे मजबुतीकरण व डांबराऐवजी काँक्रिटीकरण केले जात आहे. त्यामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणांवरून बीआरटी बस सेवा रस्त्याने धावत आहे. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात जलद, सुरक्षित, स्वस्त, आरामदायी बससेवेचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत (पीएमपी) रेनबो बीआरटी (बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम) बससेवा सुरू केली आहे. या स्वतंत्र बस मार्गामुळे विना अडथळा, विना विलंब, जलद व सुरक्षित सेवा प्रवाशांना देण्यात येत आहे. या मार्गावरील बसमुळे शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होत आहे. त्यातीलच एक मार्ग म्हणजे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणारा औंध-रावेत बीआरटी मार्ग. गेल्या तीन वर्षांपासून या मार्गावर बससेवा सुरू आहे. त्यासाठी सांगवी फाटा ते किवळे-रावेत येथील मुकाई चौक या सुमारे १६ किलोमीटर अंतरावर ११ ठिकाणी २२ बसथांबे उभारले आहेत. त्यातील ११ औंधकडून रावेतकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी तर, ११ रावेतहून औंधकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी आहेत. मात्र, हा संपूर्ण मार्ग डांबरीकरणाचा आहे. बस थांब्यांच्या परिसरातील डांबरीकरण काही ठिकाणी खचले तर काही ठिकाणी उंचवटे निर्माण झाले आहेत. या उंचसखलपणामुळे बीआरटी बसचे दरवाजे उघडण्यास अडथळे निर्माण होत होते. अर्धवट उघडलेल्या दरवाजांमधूनच प्रवाशांना धोकादायकपद्धतीने चढ-उतार करावे लागत होते. काही बसचालक बसथांबा व बस यात अधिक अंतर ठेवून बस थांबवत होते. त्यामुळे बसचे दरवाजे पूर्ण उघडत असले तरी थांब्यातील अंतर जास्त असल्याने प्रवाशांना धोकादायकरीत्या बसमध्ये ये-जा करावी लागत होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी बसथांब्यांच्या परिसरातील डांबरीकरण काढून काँक्रिटीकरण केले जात आहे. सांगवी फाट्यापासून पुनावळे येथील संत तुकाराम महाराज पुलापर्यंतच्या (बास्केट ब्रिज) थांब्यांच्या परिसरात काँक्रिटीकरण झाले आहे. बास्केट पुलापासून मुकाई चौकापर्यंतच्या थांब्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे या दरम्यान बीआरटी बस मुख्य रस्त्यावरून धावत  आहेत. लवकरच हे काम पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. 

काम १० मार्चपर्यंत होणार पूर्ण 
औंध ते किवळे-रावेत येथील मुकाई चौकापर्यंतच्या बीआरटी बस थांब्यांच्या परिसरात काँक्रिटीकरणाचे काम १० मार्चपर्यंत पूर्ण करण्याची सूचना आहे. जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम १० मार्चपूर्वीच पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे एका कनिष्ठ अभियंत्यांनी सांगितले.

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results : मुंबईत भाजप सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष, महापौर महायुतीचाच होणार

Eknath Shinde Statement: मुंबईच्या महापौर पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले..

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

SCROLL FOR NEXT