पुणे

यीन लेख

CD

ऑटोमोबाईल उद्योगात करिअरची नवी दारे

इंट्रो
भारताचा ऑटोमोबाईल उद्योग सध्या मोठ्या परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे. पेट्रोल-डिझेलवर आधारित पारंपरिक आयसीई (Internal Combustion Engine) वाहनांपासून इलेक्ट्रिक वाहनांकडे होत असलेले संक्रमण, त्याचबरोबर हायब्रीड तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता वापर यामुळे वाहन उद्योगाचे स्वरूप वेगाने बदलत आहे. या बदलाचा परिणाम केवळ वाहनांच्या तंत्रज्ञानावर होत नसून, रोजगार, शिक्षण, कौशल्ये आणि करिअरच्या संधींवरही होत आहे.
- अरविंद रेणापूरकर
---------------

पॉइंट
१) ऑटोमोबाईल उद्योगात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी
२) ईव्हीमुळे करिअरच्या नव्या संधी
३) आयसीई आणि हायब्रीड तंत्रज्ञानाचे महत्त्व कायम
४) एआय आणि सॉफ्टवेअरमुळे ऑटोमोबाइल क्षेत्रात बदल
५) बहुविध कौशल्यांना भविष्यात अधिक मागणी


सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या (SIAM) माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने देशभरात सुमारे तीन कोटी रोजगारांना आधार दिला आहे. त्यापैकी: प्रत्यक्ष रोजगार ४२ लाख जणांना, तर अप्रत्यक्ष रोजगार २.६५ कोटी जणांना मिळाला आहे. हा रोजगार वाहन उत्पादकांबरोबरच ऑटो-कॉम्पोनंट, डीलरशिप, सर्व्हिस, दुरुस्ती, वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि इतर संबंधित क्षेत्रांत दिसून येतो. याशिवाय, ‘एसीएमए’च्या २०२५ मधील एका अभ्यासात ऑटो-कॉम्पोनंट उद्योग सुमारे ५० लाख कुशल आणि अर्धकुशल कामगारांना आधार देत असल्याचे नमूद केले आहे. अर्थात भारतीय वाहन उद्योगात गेल्या दोन दशकांत अमूलाग्र बदल झाला असून पारंपरिक इंजिनकडून इलेक्ट्रिक, पर्यावरणपूरक इंजिनकडे वाटचाल सुरू झाली आहे. साहजिकच कौशल्यप्राप्त तरुणांना वाहन क्षेत्रात रोजगाराची संधी वाढताना दिसत आहे. ‘अडेको इंडिया’च्या (Adecco India) एका अंदाजानुसार, भारतातील इलेक्ट्रिक वाहन परिसंस्थेत २०३० पर्यंत नव्याने तीन ते चार कोटी रोजगारांच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. ईव्ही क्षेत्रातील मनुष्यबळाची मागणी दरवर्षी १५ ते २० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, भविष्यातील ऑटोमोबाइल रोजगार केवळ इलेक्ट्रिक वाहनांपुरता मर्यादित राहणार नाही. आयसीई, ईव्ही, हायब्रीड आणि ‘एआय’ या चारही क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्याधारित नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

भारतातील ऑटोमोबाईल उद्योगाची सुरुवात मोठ्या प्रमाणावर आयात केलेल्या वाहनांपासून झाली. स्वातंत्र्यानंतर देशांतर्गत वाहननिर्मितीला चालना मिळाली आणि हिंदुस्थान मोटर्स, प्रीमियर ऑटोमोबाईल्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्स यांसारख्या कंपन्यांनी भारतीय वाहन उद्योगाचा पाया मजबूत केला.
१९९०च्या दशकातील आर्थिक उदारीकरणानंतर जागतिक वाहन कंपन्यांनी भारतात उत्पादन सुरू केले. त्यामुळे उत्पादन तंत्रज्ञान, ऑटो-कॉम्पोनंट, डिझाइन, गुणवत्ता नियंत्रण, रिसर्च ॲंड डेव्हलपमेंट आणि वाहन निर्यात या क्षेत्रांचा वेगाने विकास झाला. आज भारतात प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने, दुचाकी, तीनचाकी आणि ट्रॅक्टर अशा विविध वाहनांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. या उद्योगाभोवती हजारो ऑटो-कॉम्पोनंट कंपन्या, डीलरशिप, सर्व्हिस सेंटर, लॉजिस्टिक्स कंपन्या आणि तंत्रज्ञान सेवा विकसित झाल्या आहेत. त्यामुळे ऑटोमोबाईल उद्योग हा मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करणारा उद्योग बनला आहे.

महाराष्ट्राचे महत्त्व
भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाच्या विकासात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे. मुंबई-पुणे औद्योगिक पट्टा देशातील प्रमुख वाहन आणि ऑटो-कॉम्पोनंट केंद्रांपैकी एक आहे. पुणे आणि परिसरात वाहननिर्मिती, इंजिन, ट्रान्समिशन, ऑटो-कॉम्पोनंट, अभियांत्रिकी आणि संशोधनाशी संबंधित मोठी औद्योगिक परिसंस्था आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि इतर औद्योगिक भागांमध्येही वाहन व अभियांत्रिकी उद्योग विकसित झाले आहेत. त्यामुळे ईव्ही, हायब्रीड आणि ‘एआय’ आधारित नवीन ऑटोमोबाइल तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी महाराष्ट्राकडे आधीपासूनच मजबूत औद्योगिक पाया उपलब्ध आहे.

आयसीई वाहनांमध्येही संधी
ईव्हीचा विस्तार होत असला तरी भारतातील पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी वाहनांचा विद्यमान बाजार मोठा आहे. त्यामुळे आयसीई वाहनांशी संबंधित रोजगार लगेच संपणार नाहीत. इंजिन टेक्नॉलॉजी, पॉवरट्रेन, ट्रान्समिशन, फ्युअल इंजेक्शन, ईसीयू, इमिशन कंट्रोल, व्हेईकल टेस्टिंग आणि डायग्नोस्टिक्स क्षेत्रांना अजूनही महत्त्व आहे. आयटीआयमध्ये मेकॅनिक मोटर व्हेईकल्स, फिटर किंवा संबंधित ट्रेड तसेच डिप्लोमा किंवा बीई/बी. टेक इन ऑटोमोबाईल्स किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा या क्षेत्रात प्रवेश करण्याचा मार्ग ठरू शकतो.

ईव्हीमुळे रोजगाराचे नवे क्षेत्र
इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या स्वीकारामुळे ऑटोमोबाईल उद्योगातील रोजगाराचे स्वरूप बदलत आहे. ईव्हीमध्ये पारंपरिक इंजिनऐवजी बॅटरी पॅक, इलेक्ट्रिक मोटर्स, इन्व्हर्टर, कंट्रोलर, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स यांना महत्त्व आहे. त्यामुळे बॅटरी इंजिनिअर, ईव्ही डिझाइन इंजिनिअर, मोटर इंजिनिअर, बीएमएस इंजिनिअर, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर, चार्जिंग टेक्निशियन आणि ईव्ही डायग्नोस्टिक्स टेक्निशियन यांसारख्या भूमिका वाढत आहेत. ईव्ही रोजगार केवळ वाहननिर्मितीपुरते मर्यादित नाहीत. चार्जिंग स्टेशन, बॅटरी सर्व्हिसिंग, बॅटरी रिसायकलिंग, फ्लीट मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स आणि सॉफ्टवेअरमध्येही संधी निर्माण होत आहेत.

हायब्रीड: आयसीई आणि ईव्हीमधील दुवा
हायब्रीड वाहनांमध्ये आयसीई इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर या दोन्ही तंत्रज्ञानांचा वापर होतो. त्यामुळे हायब्रीड टेक्नॉलॉजी हे भविष्यातील ऑटोमोबाइल उद्योगातील महत्त्वाचे क्षेत्र ठरू शकते. हायब्रीड पॉवरट्रेन इंजिनिअर, व्हेईकल कंट्रोल इंजिनिअर, बॅटरी इंजिनिअर आणि टेस्टिंग इंजिनिअर यांसारख्या भूमिका या क्षेत्रात निर्माण होऊ शकतात. इंजिन, इलेक्ट्रिक मोटर, बॅटरी, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, व्हेईकल कंट्रोल याचे ज्ञान असलेल्या अभियंत्यांना हायब्रीड क्षेत्रात विशेष फायदा होऊ शकतो.

‘एआय’मुळे नवे करिअर
ऑटोमोबाईल उद्योगातील पुढील मोठे परिवर्तन ‘एआय’ आणि सॉफ्टवेअरमुळे होणार आहे. आधुनिक वाहनांमध्ये कॅमेरा, रडार, जीपीएस, सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटमधून मोठ्या प्रमाणावर डेटा तयार होतो. या डेटाचा वापर करून वाहन अधिक सुरक्षित आणि स्मार्ट बनवण्यासाठी ‘एआय’ आणि मशिन लर्निंगचा वापर वाढत आहे. अडास, ड्रायव्हर मॉनिटरिंग, ऑटोमॅटिक इमरजन्सी ब्रेकिंग, लेन असिस्टन्स, पार्किंग असिस्टन्स, ट्रॅफिक रिकग्निशन यांसारख्या सुविधांमध्ये ‘एआय’ची भूमिका वाढत आहे. यामुळे ऑटोमोटिव्ह ‘एआय’ इंजिनिअर, मशिन लर्निंग इंजिनिअर, कॉम्प्युटर व्हिजन इंजिनिअर, अडास इंजिनिअर, ऑटोनोमस ड्रायव्हिंग इंजिनिअर, ऑटोमोटिव्ह डेटा सायंटिस्ट, एम्बेडेड डेटा सायंटिस्ट आणि ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर इंजिनिअर यांसारख्या करिअरच्या संधी निर्माण होत आहेत.

भविष्यातील कौशल्ये
भविष्यातील ऑटोमोबाईल उद्योगात मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर आणि ‘एआय’ या कौशल्यांच्या संगमाला अधिक महत्त्व मिळणार आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअर, ‘एआय’ आणि डेटा ॲनालिटिक्स शिकल्यास प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्समध्ये काम करता येईल. इलेक्ट्रिकल इंजिनिअरने ईव्ही आणि बॅटरी टेक्नॉलॉजी आत्मसात केल्यास ईव्ही पॉवरट्रेनमध्ये संधी मिळू शकते. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरसाठी बीएमएस, अडास व ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्सची दारे खुली आहेत. कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर, मशिन लर्निंग आणि ऑटोनोमस ड्रायव्हिंग क्षेत्र उपलब्ध होत आहेत.
थोडक्यात भारतीय ऑटोमोबाईल उद्योग एका नव्या युगात प्रवेश करत आहे. आयसीई वाहनांचा मोठा विद्यमान बाजार, ईव्हीचा वाढता स्वीकार, हायब्रीड तंत्रज्ञान आणि एआय सॉफ्टवेअरचा वाढता वापर यामुळे करिअरच्या संधींची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test: पडिक्कलने सलग दुसरं शतक करत ८ वर्षांचा दुष्काळ संपवला! शुभमन गिलचीही फिफ्टी, पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व

तरुणांच्या मुद्द्यावर CJP पुन्हा आक्रमक; केंद्राच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

लायब्ररीच्या वॉशरूममध्ये भिंतीला छिद्र, मोबाइल कॅमेरा लावून विद्यार्थिनींचे व्हिडिओ अन्...; मालकाच्या मुलाचं विकृत कृत्य

Dilip Walse Pati: अंगणवाडीच्या पोषण आहारावर गंभीर प्रश्न! दर्जाची निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कारवाई करा; वळसे-पाटील आक्रमक

Latur Crime: चाकूरमध्ये पहाटे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; चाकूचा धाक दाखवत १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

SCROLL FOR NEXT