Madhav-Bhandari sakal
पुणे

Ayodhya Ram Mandir : अयोध्येचे राम मंदिर भविष्यात जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनेल - माधव भांडारी

मोरया प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘राम मंदिर अयोध्येचे... केंद्र विश्‍वचैतन्याचे’ या पुस्तकाचे प्रकाशन आज भांडारी यांच्या हस्ते करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अयोध्येत उभारण्यात येत असलेले भव्यदिव्य राम मंदिर हे भविष्यात व्हॅटिकन सिटी आणि मक्का-मदिनाच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनेल, असा दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी शनिवारी (ता.९) येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केला.

मोरया प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘राम मंदिर अयोध्येचे... केंद्र विश्‍वचैतन्याचे’ या पुस्तकाचे प्रकाशन आज भांडारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी नगर वाचन मंदिरचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे, या पुस्तकाचे लेखक प्रकाश बापट, मोरया प्रकाशनचे प्रकाशक दिलीप महाजन आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

भांडारी पुढे म्हणाले, ‘‘इंग्रजांनी १८६१ मध्ये पहिल्यांदा जमिनीच्या नोंदी केल्या. त्यानुसार अयोध्या-फैजाबादच्या तत्कालीन महसुली अधिकाऱ्यांनी राम मंदिराच्या जमिनीला क्रमांक १ दिला. या जमिनीची मालकी हक्कसुद्धा श्रीराम मंदिराचाच आहे. या जमिनीवर कधीही बाबरी मस्जिदीच्या नावाचा उल्लेख नव्हता. शिवाय जमिनीची नोंदणी झाल्यापासून पुढे सातत्याने राम मंदिरात सातत्याने पूजा केली जात आहे.

यामध्ये तेव्हापासून आजतागायत कधीही खंड पडलेला नाही.तरीसुद्धा या जागेवर राम मंदिराचा हक्क शाबीत करण्यासाठी प्रदीर्घ काळ लढा द्यावा लागला. आता तो लढा पूर्णत्वाकडे आलेला असून तेथील भव्य-दिव्य राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हेच राम मंदिर भविष्यात व्हॅटिकन सिटी आणि मक्का-मदिनाप्रमाणे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनेल. अयोध्या हे हिंदू धर्मीयांचे जागतिक तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला येईल.’’

नगर वाचन मंदिरचे मधुमिलिंद मेहेंदळे यांनी प्रास्ताविक केले. एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), लेखक प्रकाश बापट, प्रकाशक दिलीप महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मंजिरी काळे आणि तृप्ती पेंडसे यांनी श्रीराम स्तुती गीताचे गायन केले. गौरी देव यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT