पुणे

आरोग्य योजनांचा लाभ घेण्याचे बारामतीकरांना आवाहन

CD

बारामती, ता. १२ : एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा बारामती तालुका व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ही योजना कार्यान्वित आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, शिधापत्रिका व आयुष्मान कार्ड आवश्यक आहे. आधारकार्ड अद्ययावत असणे, तसेच शिधापत्रिका बाराअंकी आरसी क्रमांकासह ऑनलाइन असणे गरजेचे आहे. शिधापत्रिकेवर आरसी क्रमांक नसल्यास किंवा रुग्णाचे नाव नसल्यास आरोग्यमित्राच्या माध्यमातून तहसीलदारांचा दाखला घेऊन तो तहसील कार्यालयात सादर करावा. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड उपलब्ध करून दिले जाते. नागरिकांनी आधारकार्ड व शिधापत्रिका अद्ययावत करून गुगल प्ले स्टोअरवरील आयुष्मान ॲपमधील ‘Beneficiary’ पर्याय किंवा NHA Beneficiary Portal द्वारे स्वतः आयुष्मान कार्ड काढावे, तसेच रुग्णालयातील आरोग्यमित्राकडूनही कार्ड मिळविता येईल, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hybrid Home Loan New Scheme: होम लोनच्या EMI ची चिंता मिटणार? ६५ महिन्यांसाठी व्याजदर लॉक करता येणार; 'या' बँकेची नवी हायब्रिड योजना आहे तरी काय?

Marathi News Live Updates : माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध, संसदीय समितीचा अहवाल समोर

Iphone update: भारतात लाँच होणार Apple Pay; iphone युजर्सना मिळणार 'टॅप अँड पे' सुविधा!

Ajinkya Rahane निवृत्तीनंतर घेणार 'फ्रेश गार्ड'; भारत-श्रीलंका मालिकेतून करणार नवी सुरुवात!

Maharashtra Kashmir Partnership: महाराष्ट्र–काश्मीर फलोत्पादन भागीदारीला नवी चालना; द्राक्ष-सफरचंद तंत्रज्ञान देवाणघेवाणीतून शेतकऱ्यांच्या विकासाला गती

SCROLL FOR NEXT