Baba Aadhav Sakal
पुणे

बाबा आढावांनीच टोचले 'चळवळी'चे कान

विविध अभावावरच डॉ. बाबा आढाव यांनी ठेवले बोट

सम्राट कदम

पुणे - सय्यदभाईचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प अनेकांनी बोलून दाखविला. पण मी इथं उपस्थित सर्व संघटनांना विचारू इच्छितो की, आज जो आपल्या जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यासाठी आपण काही करणार आहोत का नाही? आपल्यातील मतभेद सोडून, एकत्र येत परिस्थितीचे आव्हान स्वीकारणार का नाही? असा परखड प्रश्न ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी समाजवादी आणि समविचारी संघटनांना विचारला. आयुष्यभर मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढणारे सय्यदभाई यांच्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. यावेळी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमशुद्दीन तांबोळी, प्रा रझिया पटेल, शाहीन असीम सय्यद आदी उपस्थित होते. चळवळींतील मतभेद, समाजाशी तुटलेले नातं आणि चिकित्सक वृत्तीच्या अभावावरच डॉ. बाबा आढाव यांनी बोट ठेवले.

ते म्हणाले, "आपल्या विरोधी विचारांच्या मोदी सरकारने सय्यदभाईंना पद्मश्री प्रदान केल्यावर अनेकांनी शंका उपस्थित केली. सय्यदभाईंना पद्मश्री देऊन राजकीय वापर होतोय का अशी भीती सर्वांना होती. सय्यदभाईंचे काम खूप मोठे होते. त्यांचे काम पुढे नेण्यासाठी सर्वानी आता जे काळाचे आव्हान आपल्यासमोर उभे राहिले आहे, ते स्वीकारायला हवे. आपले वैचारिक विरोधक सामान्यांच्या भाषेत बोलतात. आपण निदान एकमेकांशी संवाद साधणार का नाही?दुसऱ्याला दूषण देऊन आता चालणार नाही. आपली चिकित्सक बुद्धी जागृत ठेवून सामान्यांच्या भाषेत आपण बोलणार आहोत का नाही? मतभेद सोडून देऊन तळागाळातील जनतेपर्यंत आपण पोहचायला हवं." पंतप्रधान आणि भाजपच्या कार्यपद्धतीबद्दल बाबा आढाव उपस्थित समाजवादी, पुरोगामी, परिवर्तनवादी संघटनांना सांगत होते. प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन, मतभेद विसरत काम करण्याची गरज डॉ. आढाव यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT