Tribute Meeting Sakal
पुणे

'शिवशाहिरा वंदन तुजला' बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली

पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथील सभागृहात 'शिवशाहिरा वंदन तुजला' हा श्रद्धांजली सभा पार पडली, यात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

तेजस भागवत

पुणे - येथील गणेश कला क्रीडा मंच येथील सभागृहात 'शिवशाहिरा वंदन तुजला' हा श्रद्धांजली सभा पार पडली, यात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुण्यापासून 11 किमी अंतरावर शिवसृष्टी उभारण्यात येत आहे. अतिशय नियोजनबद्ध अशी ही शिवसृष्टी उभारली जात असून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन दाखवण्यात येणार आहे. एका वेळी येथे 15000 पर्यटक इथे उपस्थित राहू शकतात. तसेच, जाणता राजा सभागृहात शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवनपट दाखवण्यात येणार आहे. आणि अनेक प्रकारे अपल्यावर स्वराज्याचा रोमांचकारी इतिहास अनुभवता येणार आहे.

पद्मा विभूषण, महाराष्ट्र् भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. जीवन गौरव, मध्य प्रदेश शासनाचा कालिदास ह्या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. बाबासाहेबांनी एवढे मोठे कार्य उभे केले असून , शिवचरित्र लिहून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुणांपर्यंत पोचवला आहे. त्यांचा आदर्श हा कायमस्वरूपी जपला पाहिजे.

कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, डॉ. सदानंद मोरे, वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यासह अनेक संस्था आणि बाबासाहेब यांच्या जवळील व्यक्तींनी आपले मनोगत व्हिडीओ कॉन्फरनसिंगद्वारे व्यक्त केले.

तसेच या वेळी राजमाता कल्पना राजे भोसले, जगदीश कदम, महापौर मुरलीधर मोहोळ, नाना जाधव, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली. सभेच्या शेवटी शिववंदना म्हणून बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहण्यात आली.

या वेळी कार्यक्रमाला राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदें, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नाना जाधव तसेच, जगदीश कदम, एअर मार्शल भूषण गोखले, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमाळकर इत्यादी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT