रुई (ता. इंदापूर) - बाबीर यात्रेमध्ये बाजारपेठेत घोंगडी खरेदी करणारे ग्रामस्थ.
रुई (ता. इंदापूर) - बाबीर यात्रेमध्ये बाजारपेठेत घोंगडी खरेदी करणारे ग्रामस्थ. 
पुणे

बाबीर यात्रेमध्ये घोंगडीला बाजारपेठ

सकाळवृत्तसेवा

कळस - रुई (ता. इंदापूर) येथील बाबीर यात्रेमध्ये हक्काची बाजारपेठ असलेल्या घोंगडी विक्रेत्यांनी यंदाही हजेरी लावली. यात्रेतील घोंगडी विक्रेत्यांच्या पेठेमध्ये स्थानिकांबरोबर विविध ठिकाणांहून यंदा शंभराहून अधिक विक्रेते दाखल झाले होते. यात्रा काळात सुमारे सात हजारांहून अधिक घोंगडी नगांची विक्री झाली. 

सध्या बाजारात यंत्रमागावरील घोंगड्या दाखल झाल्या आहेत. तरीही पारंपरिक घोंगडी व्यवसाय अजूनही टिकून आहे. थंडीची चाहूल लागताच सुरू झालेल्या यात्रा-जत्रांच्या काळात या व्यवसायाला यात्रा हीच हक्काची मोठी बाजारपेठ उरली आहे. यामध्ये बाबीर यात्रा, पंढरपूर, आळंदी, पैठण, पठाणकोडली, चिंचणी, म्हसा - ठाणे, वीर - मस्कोबा, सालपे बिरोबा - लोणंद या महत्त्वाच्या यात्रा मानल्या जातात. शिवाय कोकण भागातील कणकवली, फोंडा, कुडाळ येथील बाजारपेठांमध्ये घोंगडीच्या इरल्याला भात रोपांच्या लागवडीसाठी मागणी आहे. यांत्रिक मागाच्या घोंगड्यांमुळे हातमागावर घोंगडी तयार करणाऱ्यांची संख्या घटली असली तरी, चोखंदळ ग्राहक हातमागावरील घोंगड्यांना पसंती देतात. घोंगडीच्या प्रकारानुसार पाचशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत प्रति नग या दराने घोंगडीची विक्री केली जात होती.

राज्यात या व्यवसायामध्ये गारगोटी, शेणगाव (जि. कोल्हापूर), अळसंदे (जि. सांगली), मेटकरवाडी, चिखलठाण, केडगाव टाकळी (जि. सोलापूर), घोरपडवाडी, बोरी, रुई (जि. पुणे) या भागांत बोटावर मोजण्याइतपत घोंगडी विणकरांची संख्या उरल्याचे सांगितले जाते. त्यांच्याकडून घोंगडी व तिच्याशी निगडीत विविध उपप्रकारांची हातमागावर निर्मिती केली जाते. जाड घोंगडी, पांढरा पठ्ठा, जान, आसन, शाली आदींचा यामध्ये समावेश आहे. तयार केलेल्या घोंगड्यांची या राज्यातील मोठ-मोठ्या यात्रांमध्ये विक्री केली जाते.

घोंगडी विक्रेते दादा महाराज सोनवणे (रा. खर्डी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) म्हणाले, की आधुनिक युगात घोंगडीची मागणी अजूनही टिकून आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने विक्रीवर काहीसा परिणाम झाला आहे. 

बाबीर यात्रेचे नियोजन करताना घोंगडी विक्रेत्यांसाठी मंदिरालगत राखीव जागा ठेवली जाते. देवाच्या दारातून घोंगडी खरेदी करण्याची ग्राहकांची भावना असते. यामुळे विक्रेत्यांची येथे स्वतंत्र पेठ असते. यामध्ये स्थानिकांबरोबर इतरही विक्रेते हजेरी लावत असतात.
- सर्जेराव मारकड, ग्रामस्थ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT