पुणे

बदलापूरच्या ‘त्या’ चिमुकलींच्या शिक्षणावर सरकारची मोहर

CD

बदलापूरच्या मुलीचा
शिक्षणाचा मार्ग मोकळा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : बदलापूरच्या ‘त्या’ दोन मुलींच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च अखेर राज्य सरकारने उचलला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला. ‘सकाळ’च्या पाठपुराव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या दोघींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा केला आहे.
ऑगस्ट २०२४ मध्ये बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर पीडित कुटुंबांवर मानसिक आघातासोबतच मुलींच्या शिक्षणाचाही प्रश्न उभा राहिला होता. तत्कालीन शालेय शिक्षणमंत्र्यांनी मुलींच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याची घोषणा केली होती; मात्र पुढे हा विषय लालफितीत अडकून पडला होता. दरम्यान, शालेय शुल्कासाठी विचारणा झाल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी मनसेची मदत मागितली आणि हा प्रकार उघडकीस आला. ‘सकाळ’ने या विषयातील गांभीर्य लक्षात घेऊन सरकारला जाब विचारणारे वृत्त ६ मे रोजी प्रसिद्ध केले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शालेय शिक्षण विभागासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेतली. अखेर राज्य सरकारने या प्रकरणाला ‘विशेष बाब’ म्हणून मान्यता दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT