पुणे

कास - मेढा येथे बैलबाजाराचा शुभारंभ...

CD

मेढ्यात बैलबाजारास प्रारंभ

बाजार समितीमार्फत आजपासून १८ मार्चपर्यंत आयोजन

कास, ता. ९ ः जावळी बाजार समिती यांच्या वतीने व पंचायत समिती, मेढा नगरपंचायत, यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ यांच्या सहकार्याने दर वर्षी होळी ते पाडवा यादरम्यान जातिवंत जनावरांचा बाजार व प्रदर्शन भरते. या वर्षी आजपासून बुधवारपर्यंत (ता. १८) बैलबाजार भरत असून, त्याचा प्रारंभ बाजार समितीच्या कार्यालयाच्या उद्‌घाटनाने करण्यात आला.
यावेळी सभापती जयदीप शिंदे, नगराध्यक्षा रूपाली वारागडे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. पंचायत समितीचे माजी उपसभापती कांतिभाई देशमुख, उपनगराध्यक्ष विकास देशपांडे, बाजार समितीचे उपसभापती हेमंत शिंदे यांच्यासह संचालक राजेंद्र भिलारे, हणमंत शिंगटे, कमल दळवी, तुकाराम शिंदे, सुंदर भालेराव, सुरेश पार्टे, नगरसेवक नितीन मगरे, रणधीर गोरे, पुष्पा मुकणे, सोनाली पवार, तेजस्विनी इगावे, मोनिका जवळ, शर्वरी गायकवाड, सचिन करंजेकर, शांताराम पार्टे, सचिन जवळ यांच्यासह मान्यवर व व्यापारी उपस्थित होते.
सभापती शिंदे म्हणाले, ‘‘दिवसेंदिवस पशुधन कमी होत असल्यामुळे बैलबाजारातील जनावरांची आवक कमी होत आहे. त्यामुळे जातिवंत जनावरांचा बाजार भरवणे बाजार समितीला आर्थिकदृष्ट्या खर्चिक असले, तरी येथे सुरू असलेला बैलबाजार कायम सुरू राहावा, यासाठी बाजार समिती सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील आहोत.’’
सामाजिक कार्यकर्ते विनोद पार्टे यांच्या वतीने लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्याने जनावरांबरोबरच व्यापाऱ्यांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. व्यवस्थापक महेश देशमुख यांनी आभार मानले.

---------------------------------

जातिवंत जनावरे
या बाजारात खिल्लार जातीचे बैल मुख्य आकर्षण असते. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी यासह महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून व्यापारी जातिवंत जनावरे विक्रीसाठी घेऊन येतात.

----------------------------------

04699
मेढा : बैलबाजाराच्या उद्‍घाटनप्रसंगी मान्यवर.
---------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT