Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 1000 police deployed for security Sakal
पुणे

Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 : समाजाचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी पोलिसांवर कामाचा अधिक ताण

पोलिसांवर कामाचा अधिक ताण असतो. समाजाचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी पोलिसांचे स्वास्थ्यही चांगले राहणे महत्त्वाचे

सकाळ वृत्तसेवा

Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 : पोलिस कमिशनर कप हे बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन या शर्यतीचे वैशिष्ट्य राहिले आहे. यंदा या विभागाला अभूतपूर्व असाच प्रतिसाद मिळाला आहे. राज्यभरातील संख्या एक हजारच्या घरात गेली आहे.

याविषयी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रवीण घाडगे यांनी सांगितले की, पुणे शहर पोलिस, नगर, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, जालना, कोल्हापूर, मुंबई शहर, मुंबई रेल्वे, नागपूर शहर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, नवी मुंबई, सांगली, सातारा, सोलापूर, राज्य राखीव पोलिस दल, पुणे या संघांनी भाग घेतला आहे.

दृष्टिक्षेपात

  • एकूण धावपटू : ९६५

  • पुणे विभाग : ७२५

  • इतर जिल्हे : २४०

  • पुरुष : ७१०

  • महिला : २५५

‘सकाळ’तर्फे आयोजित पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये दरवर्षी पुणे शहर पोलिस दलाचा सहभाग असतो. यंदाही सलग चौथ्यांदा हाफ मॅरेथॉनमध्ये पुणे शहर पोलिस दलासह राज्यभरातून पोलिस अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत.

पोलिसांवर कामाचा अधिक ताण असतो. समाजाचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी पोलिसांचे स्वास्थ्यही चांगले राहणे महत्त्वाचे आहे. पोलिसांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासह उत्तम आरोग्यासाठी पुणे हाफ मॅरेथॉनचा निश्चितच लाभ होत आहे.

- रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT