पुणे

पाटण, लोकनेते जयंती

CD

लोकनेत्यांच्या विचाराने करा वाटचाल

रविराज देसाई; म्हावशीत बाळासाहेब देसाई जयंती, पारितोषिक वितरण

पाटण, ता. १० ः लोकनेत्यांचे बालपण संघर्षमय गेले; परंतु जीवनात त्यांनी विविध मंत्रिपदे सांभाळताना सर्वसामान्य जनतेसाठी लाभदायक निर्णय घेऊन जनहिताचे काम केले. सहावेळा पाटण मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. लोकनेत्यांचा आदर्श आणि विचारांचा वारसा आपण जपत असून, त्यांच्या विचाराने वाटचाल सुरू आहे. विद्यार्थ्यांनी लोकनेत्यांचे विचार नजरेसमोर ठेवून वाटचाल करावी, असे आवाहन मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांनी केले.

म्हावशी येथे जिल्हा परिषद व येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकनेते बाळासाहेब देसाई यांची ११६ वी जयंती व पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. आदित्यराज देसाई, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिद, अशोकराव पाटील, माजी उपसभापती मिलिंद पाटील, बशीर खोंदू, डी. पी. जाधव, सदाभाऊ जाधव, विकास जाधव, विद्या शिंदे, मंगल माने, राधिका पाटील, विजया कुंभार, अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

लोकनेते देसाई यांच्याबद्दल घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांची यावेळी भाषणे झाली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याबद्दल पुस्तक लिखाण करणाऱ्या शिक्षकांना, लोकनेत्यांची रांगोळी व फलकचित्र रेखाटणाऱ्या शिक्षकांचा सन्मान केला. गटविकास अधिकारी सरिता पवार यांनी स्वागत केले. गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर यांनी आभार मानले.

............
चौकट
............

महिला सदस्या शेवटच्या रांगेत

पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आहेत. मात्र, पदाधिकारी निवडी न झाल्याने निवडणुकीनंतर पंचायत समितीचा हा पहिलाच शासकीय कार्यक्रम हाेता; परंतु व्यासपीठावर नूतन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महिला सदस्यांना शेवटच्या रांगेत बसावे लागले. पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी व सदस्यांसह अनेक पदाधिकारी नसणारे कार्यकर्ते पहिल्या, दुसऱ्या रांगेत होते.

A01248
म्हावशी ः लोकनेते बाळासाहेब देसाई जयंती कार्यक्रमात बाेलताना रविराज देसाई. त्या वेळी मान्यवर.
............................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे येथील सुरभी लॉजवर पोलिसांचा छापा

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

Mamata Banerjee Exit Poll Reaction : ममता बॅनर्जींचा मोठा दावा! 'एक्झिट पोल्स' पुन्हा एकदा फेल ठरणार; तृणमूल काँग्रेसला मिळणार 226 पेक्षा जास्त जागा

SCROLL FOR NEXT