बालेवाडी, ता. २० : बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनतर्फे (बी.डब्ल्यू.एफ) दरवर्षी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा सन्मान केला जातो. यावर्षी ‘बी.डब्ल्यू.एफ नागरिक पुरस्कार २०२६’ सोहळा बालेवाडी येथील आदित्य ब्रिज पार्क सोसायटीत शिवजयंतीनिमित्त उत्साहात पार पडला.
‘द पावर ऑफ वन ट्रस्ट’च्या माध्यमातून २०१६ पासून ३३० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत केल्याबद्दल प्रसाद नारायण यांना गौरविण्यात आले. तसेच ‘राजाभाऊ गुडदे फाउंडेशन’चे किरण गुडदे यांना दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आर्थिक मदत व धान्य वितरण आदी उपक्रमांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन व पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले. या वेळी आवारे पाटील यांनी ‘छत्रपती शिवराय : सत्य आणि संभ्रम’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात चित्रकला स्पर्धा व बक्षीस वितरणही पार पडले.
या वेळी बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे मोरेश्वर बालवडकर, रमेश रोकडे, आशिष कोटमकर, शुभांगी चपाटे, दफेदार सिंह, सुनील गाळणकर, योगेंद्र सिंह, वंदना चौधरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मृणाल गायकवाड यांनी केले. शुभांगी चपाटे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.