पुणे

मध्य रेल्वे बाळेत साकरणार स्टेबलिंग यार्ड

CD

मध्य रेल्वे बाळेत साकारणार स्टेबलिंग यार्ड

१५.३४ कोटींच्या निविदा प्रसिद्ध; सहा नवीन ट्रॅक उभारणार

अरविंद मोटे : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३१ : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मालवाहतूक व प्रवासी गाड्यांच्या संचलनाला अधिक गती देण्यासाठी बाळे येथे अत्याधुनिक स्टेबलिंग यार्डचा विकास होणार आहे. येथे पूर्वीच्या चारपदरी लोहमार्गाच्या जोडीला नवीन सहा मार्ग तयार होणार आहेत. यामुळे येथील मालवाहतुकीचा विस्तार करण्यात येणार आहे.
सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (कार्य) यांच्याकडून या संयुक्त कामासाठी १५ कोटी ३४ लाख ११ हजार ११६ रुपये अंदाजित खर्चाची ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, येथे नव्याने सहा ट्रॅकसह इमारतींचे बांधकाम होणार असल्याची निविदा प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये बाळे येथे सहा नवीन रूळ टाकण्यात येणार असून, ट्रॅक एक्झिक्युशनसह आवश्यक अभियांत्रिकी आणि इमारत बांधकामाचाही समावेश आहे. सहा स्टेबलिंग साइडिंग विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यामुळे बाळे स्थानकावरील गुड्स शेडचा कायापालट होणार आहे. या कामासाठी २४ महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे.
यामुळे रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ताण कमी होणार आहे. रेल्वे गाड्यांच्या सुरक्षित आणि सोयीस्कर पार्किंगसाठी स्टेबलिंग यार्ड हे अत्यंत महत्त्वाचे असते. बाळे येथे स्टेबलिंग यार्डचा विकास व हिरेनंदुरू येथे लूप लाइनचा विस्तार या दोन कामांसाठी १५ कोटी ३४ लाख ११ हजार ११६ रुपयांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत.

स्टेबलिंग यार्ड म्हणजे काय
स्टेबलिंग यार्ड म्हणजे रेल्वेच्या गाड्या त्यांच्या पुढील फेरीपूर्वी काही काळ उभ्या ठेवण्यासाठीची जागा. एखादी प्रवासी गाडी सोलापूरला येऊन लगेच परतीच्या फेरीला जाणार नसेल, तर ती मुख्य धावत्या मार्गावर न ठेवता अशा स्टेबलिंग लाइनवर ठेवता येते. त्यामुळे मुख्य रेल्वे मार्ग मोकळा राहतो. इतर गाड्यांची ये-जा अधिक सुरळीत करता येते. यामुळे रेल्वेच्या वाढत्या वाहतुकीसाठी अतिरिक्त क्षमता निर्माण होते.

बाळे येथे सिमेंट, खतांची आवक व साखरेची मोठी जावक हाताळली जाते. बाळे येथे अतिरिक्त स्टेबलिंग सुविधा उपलब्ध झाल्याने सोलापूर विभागातील एकूणच रेल्वे ऑपरेशन्समध्ये वाढ होणार आहे. यासाठी नव्याने भूसंपादनाची गरज नाही. रेल्वेच्या जागेवरच हा विस्तार होत आहे.
— जयदीप प्रदक्षिणे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi Retirement : "हा निर्णय मनाला वेदना देणारा"; लिओनेल मेस्सीची निवृत्ती, म्हणाला, ''आता माझ्याकडे देण्यासाठी...''

Tukaram Mundhe: ‘हे तर आमचे पाळीव आहेत!’ रेस्टॉरंटच्या किचनमध्ये डझनभर उंदीर, मॅनेजरचा भन्नाट बहाणा; तुकाराम मुंढेनी सांगितला किस्सा

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

OBC Mahamorcha : ओबीसी समाजाची मोठी तयारी! १ सप्टेंबरला पाटसहून महामोर्चा

SCROLL FOR NEXT