बालगंधर्व रंगमदिर - बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात इनॉक डॅनियल्स यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी (डावीकडून) डॅनियल्स,  मुक्ता टिळक, वामन केंद्रे.
बालगंधर्व रंगमदिर - बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात इनॉक डॅनियल्स यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी (डावीकडून) डॅनियल्स, मुक्ता टिळक, वामन केंद्रे. 
पुणे

मूळ रंगमंदिराला धक्का लागणार नाही

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बालगंधर्व रंगमंदिराची फेरउभारणी करण्याच्या योजनेला गती आली असतानाच ‘मूळ रंगमंदिराला फारसा धक्का लागणार नाही, याची काळजी घेऊ,’ अशी भूमिका महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी मांडली. दुसरीकडे मात्र ‘नवा रंगमंच बांधून नवीन काही करणार आहात का,’ असा प्रश्‍न विचारत ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याला अप्रत्यक्षपणे विरोध दर्शविला. 

बालगंधर्व रंगमंदिराच्या ५२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी बालगंधर्व रंगमंदिराबाबत नव्याने  विषय पुढे आला. या वेळी केंद्रे, टिळक यांच्यासह चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आदी उपस्थित होते. ज्येष्ठ संगीतकर्मी इनॉक डॅनियल्स यांना या कार्यक्रमात यंदाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तर, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम यांना बालगंधर्व विशेष गौरव व बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक सुनील मते यांना ‘बालगंधर्व पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. या वेळी महापौर म्हणाल्या, ‘‘सध्या शहरात वाहनांची संख्या वाढतेय.

बालगंधर्व रंगमंदिर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. परंतु जुने मंदिर न पाडता ते सुधारण्याचा विचार करीत आहोत. समाजाच्या, रंगकर्मींच्या भावना, आधुनिक दृष्टिकोन व तंत्रज्ञान हे सर्व सांभाळून रंगमंदिर अद्ययावत केले जाईल.’’ 

त्यावर केंद्रे ताशेरे ओढत म्हणाले, ‘‘आपल्याला केवळ नवे सुचते. त्यातून चांगल होणार असेल, तर ठीक. थिएटर कसे असावे, याचा उत्तम नमुना म्हणजे ‘बालगंधर्व’ आहे. ही केवळ वास्तू नसून भारताची संस्कृती आहे. ती आहे त्या परिस्थितीत डागडुजी करून आधुनिक पद्धतीने जपली पाहिजे.

सरकार येईलही व जाईलही त्यातील सर्व लोक सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील असतीलच असे नाही. परंतु, त्यांच्यावर नजर ठेवणे आपले काम आहे.’’ बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याबाबत ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी ठणकावले. 

डॅनियल्स पुरस्काराला उत्तर देताना म्हणाले, ‘‘जगात कुठेही सादरीकरण करताना घाबरलो नाही. कारण पुण्यातील रसिकांचा मला अनुभव होता. येथील रसिक दर्जेदार असेल, तरच मनभरून कौतुक करतात.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT