पुणे

येवला : जयघोषात येवल्यात निघाली सम्राट बळीराजाची भव्य शोभायात्रा..!

CD

जयघोषात निघाली
बळीराजाची भव्य शोभायात्रा..!

येवल्यात आयोजन; सम्राट बळीराजा गौरव दिन साजरा

सकाळ वृत्तसेवा
येवला : ‘बळीराजाचा जयघोष, समतेचा विचार आणि परिवर्तनाचा जागर...’ अशा उत्साही वातावरणात येथे सम्राट बळीराजा गौरव दिन साजरा करण्यात आला.

बळीराजाच्या वेशातील सत्यजित चित्ते यांच्या उपस्थितीने शोभायात्रेला विशेष रंगत आली. मात्र, बळीराजाच्या गौरवाचा जयघोष होत असतानाच दुसरीकडे दुष्काळाच्या झळांनी होरपळणारा शेतकरी, चाऱ्यासाठी भटकणारे पशुधन आणि शासनाच्या घोषणांपुरतीच मर्यादित राहिलेली मदत,या वास्तवाकडे कार्यकर्त्यांनी भाषणांतून लक्ष वेधले.

येथील सत्यशोधक परिवाराच्या वतीने आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी रज्जाक पठाण होते. प्रारंभी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बळीराजाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बळीराजाची शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा आणि बळीराजाच्या जयघोषामुळे शोभायात्रेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

ॲड. दिलीप कुलकर्णी यांनी शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापनावर टीका केली. महाराष्ट्रातील ३५८ तालुक्यांपैकी ३०५ तालुके शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केले असतानाही या भागांमध्ये सिंचन, पाणीपुरवठा आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी अपेक्षित मदत मिळालेली नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून चारा छावण्यांबाबत प्रत्यक्ष कार्यवाही करण्याऐवजी केवळ घोषणाच केल्या जात आहेत सध्याचा दुष्काळ गेल्या पाच ते सहा दशकांतील अत्यंत भीषण दुष्काळ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विक्रम गायकवाड म्हणाले की, बलिप्रतिपदा ही केवळ उत्सवाची नव्हे, तर बळीराजाच्या स्मृतीची आणि नव्या सामाजिक क्रांतीच्या विचारांची प्रेरणा ठरावी. बळीराजाचे निर्वाण हे नव्या परिवर्तनाचे प्रतीक बनले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

कॉम्रेड भगवान चित्ते यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या संस्थांचे अस्तित्व केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे धोक्यात येत असल्याचा आरोप केला. शेतकरी, विरोधी पक्ष आणि सरकारविरोधी संघटनांना ‘दिमागी नक्षलवादी’ ठरविण्याच्या प्रवृत्तीचा त्यांनी जाहीर निषेध केला. डॉ. दादासाहेब मोरे म्हणाले की, देशाचे खरे राजे बहुजन असून बळीराजा हा त्यांचा आदर्श राजा होता. केवळ भाऊबीजेच्या दिवशी ‘इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ असे म्हणून चालणार नाही, बहुजनांनी सक्रियपणे प्रयत्न केले पाहिजेत.

कॉ. किशोर जाधव यांनी इथेनॉलसंदर्भातील निर्बंधांचा साखर उद्योगावर होणारा परिणाम स्पष्ट केला. या निर्बंधांमुळे सुमारे सात हजार कोटी रुपयांचा फटका साखर उद्योगाला बसण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकरी आणि बळीराजाच्या आर्थिक परिस्थितीवर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन नितीन संसारे यांनी केले.कार्यक्रमास नानासाहेब शिंदे, मच्छिंद्र आहेर, दिनकर दाणे, आनंद चित्ते, प्रवीण अहिरे, धम्मानंद सोनकांबळे, प्रा. रामप्रसाद वाव्हळ, रोहिणी चित्ते, ऐश्वर्या चित्ते, मंगला खरात, छाया खंडागळे, सुजाता शिंदे, गुलाब सय्यद, सबुर मोमीन, प्रियंका नढे, समीर देशमुख, नितीन साबळे, दिनकर अहिरे, बाबूलाल पडवळ, किरण अहिरे, संदीप पगारे, समाधान पगारे, लक्ष्मण पोळ, अरुण खैरनार, रमेश खैरनार, विलास चित्ते, वाल्मीक लोखंडे, प्रवीण खडांगळे, श्रेया सोनवणे आदी उपस्थित होते.

फोटो
येवला : बलिप्रतिपदेला ‘बळीराजा गौरव दिना’निमित्त येथून निघालेली बळीराजाची मिरवणूक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कंटेनरने २२ वाहनांना फरफटत नेले अन्...

IND vs NZ, 4th ODI: न्यूझीलंड ऑलआऊट, तरी भारतासाठी विजय कठीण! आजपर्यंत कधीच घडलं नव्हतं, ते घडवण्याची संधी

'त्या सेटवर नेमकं काय घडलं, मला सगळ्यांनी सांगितलं'; नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरणावर महेश मांजरेकरांचं मोठं वक्तव्य

श्रीवर्धनला 'ब्ल्यू फ्लॅग'! सागरी किनाऱ्याला जागतिक स्तरावर नवी ओळख; रोजगाराची संधी

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँक अध्यक्षांची निवड बुधवारी; महेंद्र लाड, विश्वजित कदम, देवराज पाटील शर्यतीत

SCROLL FOR NEXT