Baner Balewadi Rain sakal
पुणे

Baner Balewadi Rain Update: बाणेर बालेवाडी परिसरात पावसाने हाहाकार; जनजीवन विस्कळीत

बाणेर, बालेवाडी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सर्वच रस्ते जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले.

शीतल बर्गे

बालेवाडी - बाणेर, बालेवाडी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सतत रिमझिम पाऊस पडत आहे. काल रात्री पासूनच या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सर्वच रस्ते जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले. मुळा नदीकडे अनेक सोसायटीच्या पार्किंगमध्ये, त्याचबरोबर बाणेर ऑफिस, बाणेर बालेवाडी स्मशान भुमी पाण्याखाली गेली. त्यामुळे या भागातील राजकीय नेते मंडळी रस्त्यावर उतरून नागरिकाच्या मदतीस धावून आले.

बालेवाडी येथे दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. सकाळी सात वाजल्यापासून भाजी विक्रेत्यांनी भाजी विक्रीस आणली होती, परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे विक्रेत्यांचे चांगलेच हाल झाले. भाज्या पावसामध्ये भिजून खराब झाल्या, तर ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवल्यामुळे त्यांचे खूपच नुकसान झाले. अनेक सोसायट्यांच्या पार्किंग मध्ये पाणी साठल्याने नागरिकांनी आपली वाहने पार्किंग मधून काढून रस्त्याच्या बाजूला पार्क करणे पसंत केले.

अनेक सोसायट्यांमध्ये व नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे या भागातील माजी नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस सदस्या पुनम विधाते, राहूल धनकुडे यांनी नागरिकांना मदतकार्य सुरू केले.

ज्यांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे अशा नागरिकांसाठी बाणेर येथील बाबुराव कटके शाळेमध्ये निवासाची आणि जेवणाची व्यवस्था विधाते यांनी केली आहे. त्याच बरोबर सर्व माजी नगरसेवकानी प्रसारमाध्यमांच्या माध्यमांवरून कोणाला काही मदत लागल्यास आपल्याशी संपर्क साधावा जेणेकरून ताबडतोब मदत मिळेल असे आवाहन केले आहे.

सदर कोसळणार्‍या पावसामुळे अनेक नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले. शाळेला सुट्टी जाहीर केली असली तरी अनेक शाळांनी ऑनलाईन शाळा घेतल्या.

औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन टीम तयार केली असून ज्या भागांमध्ये तक्रार येईल त्या भागांमध्ये पोचून मदत कार्य सुरू आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने ०२०२५५९७०० या नंबर वर तक्रार करण्याचे आवाहन क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांनी केले आहे.

या भागातील अनेक नाले बुजविल्यामुळे पाणी वाहून जायला जागाच राहिली नसल्याने रस्त्यांना असे नाल्याचे स्वरुप प्राप्त होत आहे.

- अमेय जगताप. बालेवाडी

बालेवाडी परिसर -

* मिटकॉन शाळा

* साई चौक

* ममता चौक

* अष्टविनायक चौक

* इरा बेकरी रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले.

* स्मशान भूमी , विसर्जन घाट पाण्याखाली गेला

बाणेर येथील परिस्थिति -

* पॅनकार्ड रस्ता

* दत्त मंदिर परिसर

* जुपिटर हॉस्पिटल परिसर

* प्रथमेश पार्क

* साईदत्त रेसिडेन्सी

* जानकी रेसिडेन्सी

* बाणेर पोस्ट ऑफिस

* विधाते वस्ती

* दत्त नगर

* धनकुडे वस्ती

* येथे मोठ्या प्रमाणात पाणी साठले.

* बाणेर स्मशान भूमी पाण्याखाली गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: संसदेच्या बाहेर लोक गोळा करायचे अन् बालिश चाळे...; शिंदे खासदाराची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

IND vs ENG 5th Test: ८ वर्षांनी संधी मिळाली, पण Karun Nair ने माती केली! कसोटी कारकीर्द संपल्यात जमा, कारण...

Latest Maharashtra News Updates Live: रेल्वे कर्मचाऱ्यांवर हल्ला

Badlapur Accident: बदलापुरात भीषण अपघात! ट्रकचे नियंत्रण सुटले, अनेक गाड्यांना धडक; एकाचा मृत्यू, ७ जण जखमी

Pali News : सरसगड किल्ल्यावरून पडून तरुण गंभीर जखमी; डोक्याला इजा, खांदा फॅक्चर

SCROLL FOR NEXT