ढाका, ता. १५ (पीटीआय) : वस्त्रोद्योगात आघाडीवर असलेल्या देशांपैकी एक असलेल्या बांगलादेशमध्ये कामगारांच्या आंदोलनाचा वस्त्रनिर्मिती क्षेत्राला आजही फटका बसला. कामगारांच्या वेतनवाढीच्या मागणीच्या मुद्द्यावर उद्या (ता. १६) बैठक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज १३ कारखाने बंद करावे लागले, तर इतर पाच कारखान्यांमध्ये कामाचे दिवस कमी करावे लागले.
गाझीपूर जिल्ह्यातील कोनाबरी आणि मौछाक भागांमध्ये आज वस्त्रोद्योग क्षेत्रातील कामगारांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. कामगारांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला. काही ठिकाणी ध्वनिबाँबचा (साउंड ग्रेनेड) वापर केला. किमान मासिक वेतन १२,५०० टका (बांगलादेशचे चलन) वरून ३० हजार टका इतके करावे, अशी कामगारांची मागणी असून मागील काही आठवड्यांपासून ते यासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे अनेक कारखाने बंद पडले असून बांगलादेशच्या निर्यातीला मोठा फटका बसला आहे. चीननंतर बांगलादेश हा तयार कपड्यांचा सर्वांत मोठा निर्यातदार देश आहे. या क्षेत्रात चाळीस लाख कामगार असून बांगलादेशच्या एकूण निर्यातीत या क्षेत्राचा वाटा ८० टक्के आहे. या आंदोलनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पुरवठा साखळीही विस्कळित झाली आहे. कामगारांच्या मागणीवर विचार करण्यासाठी बांगलादेश सरकारने एक नोव्हेंबरला वेतन आयोगाची स्थापना केली असून या आयोगामार्फत वाटाघाटी सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.