bank.jpg
bank.jpg 
पुणे

बँका व पतसंस्था उद्यापासून सुरू

चंद्रकांत घोडेकर

जुन्नर - आंबेगाव उपविभागाअंतर्गत आंबेगाव तालुक्यातील मंचर व जुन्नर तालुक्यातील नारायणगाव ,आळेफाटा, जुन्नर येथील सर्व सरकारी व सहकारी बँका , पतसंस्था उद्यापासून सुरू करण्याचा आदेश प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिला आहे. तसेच या भागातील खते बी-बियाणे,कृषी  औषध  दुकाने सुरु करण्यातचे आदेश दिले आहेत.
 
राजस्थानच्या राजकीयनाट्यात बसपाची उडी; काँग्रेसविरोधात न्यायालयात जाणार
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील मंचर व जुन्नर तालुक्यातील नारायणगाव ,आळेफाटा, जुन्नर  शहर येथे मोठ्या प्रमाणात  कोरोना  विषाणूचा संसर्ग झाल्याने बाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती. त्यामुळे ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली होती. या निर्णयाचा फटका बॅंका, सहकारी पतसंस्था यांना बसला आहे.

बॅंका ,पतसंस्था बंद असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदी करणे इतर घरगुती गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचण निर्माण   झाली होती. तसेच खते ,बी बियाणे ,औषधे ही दुकानेही ही बंद होती. याचा शेतकरीवर्गाला खरीप हंगामात मोठा फटका बसला आहे. यासंदर्भात राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा व आंबेगाव तालुका खत व बियाणे औषधे संघटनेचे अध्यक्ष महेश मोरे यांनी अडचणी मांडल्या.  

चिनी कंपन्यांचे वागणे ईस्ट इंडिया कंपनीसारखे; अमेरिकेचा पुन्हा हल्लाबोल
प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्यामुळे बॅंका व सहकारी पतसंस्था बंद होत्या. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदी तसेच इतर घरगुती गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही बाब शिष्टमंडळाने वळसे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. वळसे-पाटील यांनी प्रांताधिकारी संजय तेली यांना सूचना केल्या होत्या.संजय तेली यांनी 14 जुलै च्या आदेशान्वये याठिकाणी शासकीय-निमशासकीय खाजगी बँका सहकारी बँका ,पतसंस्था ,विविध कार्यकारी सोसायट्या चालू ठेवण्याचा आदेश निर्गमित केला आहे.

दरम्यान आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्यामुळे छोट्या-मोठ्या पतसंस्था, बँका बंद आहेत .अनेक गावांमध्ये खते बी-बियाणे औषधे बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. याबाबतही प्रांताधिकारी यांनी निर्णय घ्यावा. अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT