पुणे

प्रभाग समस्या प्रभाग १३

CD

वास्तव वेध
प्रभाग १३
---
PNE26W18497
सोलापूर : बापूजीनगर परिसरात असा गढूळ पाण्याचा होतोय पुरवठा.
............
बापूजीनगर परिसरात रस्ते, पाणी अन्‌ स्वच्छतेचा प्रश्न तीव्र
रस्त्यावरील दिवे लावण्याची करावी लागते आठवण; दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आरोग्याची भीती
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १२ : स्लॉटर हाउस, बापूजीनगर, शास्त्रीनगर परिसरात मागील अनेक दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रभाग १३ मध्ये अनेक रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. या प्रभागात अनेक वेळा रात्री रस्त्यावरील दिवे लावले जात नाहीत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यासाठी फोन करावा लागतो. त्यानंतरच दिवे लावले जातात, अशी अवस्था या प्रभागात असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
प्रभाग १३ मध्ये अनेक समस्या आहेत. या प्रभागात घंटागाडी वेळेवर येत नाही. सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही. ड्रेनेज, गटारीमधील गाळ पावसाळ्यापूर्वी काढणे गरजेचे असताना अद्यापही नालेसफाई झालेली नाही. अनेक ठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था नाही. सार्वजनिक मुतारी व स्वच्छतागृहांची अवस्था खूप वाईट आहे. अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत.
अशोक चौक बाजारात कचरा, पथदिव्यांची व्यवस्था प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांना व महिला ग्राहकांना सार्वजनिक स्वच्छतागृहांची आवश्यकता आहे.
बापूजीनगर येथे नागरिकांसाठी एखादी बाग, वॉकिंग ट्रॅकची व्यवस्था गरजेचे आहे. पाथरूट चौक येथील बगीचा सुधारून नागरिकांसाठी खुले करण्याची आवश्यकता आहे. कालच झालेल्या पाणीपुरवठ्यात या परिसरात पिवळा रंग असलेले दुर्गंधीयुक्त पाणी नळाला आलेले आहे. या पाण्याला वास येत असल्याने पाणी पिल्याने छातीत जळजळ होण्याचा त्रास होत आहे.
---
पाणी भरण्यासाठी घ्यावी लागते सुट्टी
प्रभाग क्रमांक १३ मधील स्लॉटर हाउस, बापूजीनगर परिसरात गेले अनेक महिने अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या प्रभागात कष्टकरी, कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. येथे चार दिवसांनी पाणीपुरवठा होतो. मात्र, पाण्याचे नियोजन नसल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडते. तसेच पाणीपुरवठा कमी दाबाने व उशिरा होत असल्यामुळे पाणी येण्याच्या दिवशी या परिसरातील नागरिकांना कामाला सुट्टी घ्यावी लागते. शाळा सुरू असताना अनेक विद्यार्थ्यांना पाणी भरण्यासाठी सुट्टी घ्यावी लागली आहे.
...........
कोट
PNE26W18495
सोलापूर शहरातील बापूजीनगर, स्लॉटर हाउस, लष्कर परिसर, सतनाम चौक परिसर, शास्त्रीनगर आदी भागात पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाला आहे. हे पाणी पिण्यायोग्य आहे का? गेल्या वर्षी मोदीखाना परिसरात अशाच पाणीपुरवठ्यामुळे दोन मुलींचा नाहक बळी गेला होता. महापालिका आयुक्त व महापौरांनी याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
- मल्लिकार्जुन पिलगेरी, शास्त्रीनगर, सोलापूर
............
PNE26W18498
बापूजीनगर परिसरातील असादे यांचे घर ते नवशक्ती तरुण मंडळ दरम्यानच्या रस्त्याचे काम रखडले आहे. हा रस्ता मंजूर असूनही डांबरीकरण केले जात नाही. याबद्दल ऑनलाइन तक्रारी केल्या, प्रत्यक्ष भेटून सांगितले तरीही रस्त्याचे काम केलेले नाही. या परिसरात रस्त्यावरील दिवे लावले जात नसल्याने अनेकदा अंधार असतो. या परिसरात मुलांसाठी एकही बाग नाही.
- अशोक म्हेत्रे, बापूजीनगर, सोलापूर
.............
PNE26W18528
उजनीतूनच पाणी पिवळसर येत असल्यामुळे कदाचित पाण्याला पिवळसर रंग असू शकतो. रस्त्याच्या कामासाठी सध्या डांबर उपलब्ध नाही, असे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. डांबर उपलब्ध होताच रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
- विजय चिप्पा, नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT