Covid Vaccine esakal
पुणे

Baramati : मंगळवारी होणार 19 हजार जणांचे लसीकरण

प्रशासनाने केली आहे जय्यत तयारी

मिलिंद संगई, बारामती

बारामती : येथील शहर व तालुक्यात मंगळवारी (ता. 31) लसीकरणाची (vaccine) मोठी मोहिम राबवली जाणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी या बाबत माहिती दिली. बजाज समूहाच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेला कोविशिल्ड लसी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या सूचनेनुसार राजीव बजाज (rajiv bajaj) यांनी या लसी पुणे विभागासाठी उपलब्ध करुन दिल्याची माहिती आहे. याच लसीतून पुणे (pune) जिल्हा व बारामती (baramati) तालुक्यास अधिकच्या लसी प्राप्त होणार आहेत. या लसींचे लसीकरण मंगळवारी केले जाणार आहे.

बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात 85 गावातून तर बारामती शहरातील सहा अशा एकूण 91 लसीकरण केंद्रावर सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत लसीकरण केले जाणार आहे. या लसीकरणामध्ये 18 वर्षावरील सर्व लोकांना पहिला डोस व 84 दिवस पूर्ण झालेल्या प्रलंबित लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी पहिला डोस व दुसरा डोस अशा स्वतंत्र रांगा लावण्यात येतील, तसेच महिलांसाठी स्वतंत्र रांग करण्यात येणार आहे.

नागरिकांनी लसीकरण केंद्रावर शिस्तीचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन डॉ. खोमणे यांनी केले आहे. मंगळवारी एका दिवसासाठी बारामती तालुक्याला 19 हजार डोसेस प्राप्त झाले असून, हे सर्व डोस उद्या एका दिवसातच वापरले जाणार आहेत, त्यामुळे केंद्रावर मिळालेली लस संपेपर्यंत लसीकरण सुरू राहणार आहे.

प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन करायचे असून लसीकरण केंद्रांवर जाताना प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे व आपला नंबर आल्यानंतरच लसीकरण करून घ्यावे. तसेच हॉटस्पॉट गावांमध्ये लसीकरण केंद्रांवर एंटिजेन तपासणी करण्यात येणार असून त्यासाठीसुद्धा नागरिकांनी सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT