पुणे

बारामतीत शनिवारपासून पोस्ट पेमेंट बँक सुरु

मिलिंद संगई

बारामती शहर - ग्रामीण जनतेला बँकीग सुविधा सुलभतेने मिळावी या उद्देशाने बारामतीत शनिवारपासून (ता. 1) पोस्ट पेमेंट बँक सुरु होत आहे. खासदार अमर साबळे व नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या उपस्थितीत या बँकेचे उदघाटन होणार आहे. 

पुणे विभागात बारामतीसह अहमदनगर, श्रीरामपूर, सोलापूर व सातारा येथे पोस्ट पेमेंट बँक सुरु होणार आहे. इंडीया पोस्ट बँकेत बचत व चालू खाते सुरु करता येणार असून देशभरात कोठेही पैसे पाठविणे शक्य होणार आहे. घरपोच बँकीग सुविधा आणि बँकेत प्रत्यक्ष येऊन व्यवहार अशा दोन्ही सुविधा या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. 

ग्रामीण भागातील ग्रामस्थांना बँकींग सेवा तातडीने त्यांच्या दारात मिळाव्यात या उद्देशाने ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. पोस्टमनच्या मदतीने ग्रामस्थ घरबसल्या विविध व्यवहार सहजतेने करु शकतील, त्या साठी त्यांना बॅंकेत जाण्याचीही गरज भासणार नाही. 
छोट्या व्यावसायिकांना ही बँक उत्तम ठरणार असून किमान बॅलन्सची मर्यादा खात्यावर नसल्याने त्याचा फायदा होईल, मात्र एक लाखापर्यत व्यवहाराची यावर मर्यादा आहे. अधिकाधिक लोकांना बँकीग सेवा उपलब्ध करुन द्यावी या उद्देशाने आणि पोस्टावर असलेला लोकांचा विश्वास या दोन्हीचा संगम साधत ही बँक सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

बदलत्या काळानुरुप या बँकेचे कामकाज हे पेपरलेस होणार आहे. अगदी खाते उघडण्यापासून इतर सर्व व्यवहार हे यंत्राद्वारेच होणार असून पेपरलेस कामकाज हे या प्रणालीचे नवीन वैशिष्टय ठरणार आहे. देशभरात या बँकेचे मजबूत जाळे असल्याने त्याचा लाभ सर्वांना घेता येणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT