baramati City Police work comfortable environment
baramati City Police work comfortable environment  sakal
पुणे

Baramati : बारामतीत पोलिस करणार आरामदायक वातावरणात कामकाज!

मिलिंद संगई, बारामती

बारामती : शहरातील पोलिसांना आगामी काळात कामकाज करताना आरामदायक वातावरणात व सुसज्ज इमारतीत काम करणे शक्य होणार आहे. पारंपरिक इमारतींऐवजी अत्याधुनिक व सुसज्ज इमारतीतून सर्व सुविधांनी युक्त अशा वातावरणात बारामतीत पोलिस दल जूनपासून कामकाज करणार आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्य पुढाकारातून प्रशासकीय भवन समोरील जागेमध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय, बारामती शहर पोलिस ठाणे व बारामती वाहतूक पोलिसांच्या कार्यालयाच्या इमारतींचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. दोन महिन्यात फर्निचरचे काम पूर्ण करुन नवीन इमारतीतून या तिन्ही विभागांचे कामकाज सुरु होईल, अशी अपेक्षा आहे.

या मध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयासाठी 1714, शहर पोलिस ठाण्यासाठी 1671 तर वाहतूक शाखेसाठी 798 स्क्वे.मीटर क्षेत्रफळाच्या इमारती तयार झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम पूर्ण केले असून आता फर्निचर झाल्यानंतर प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ होईल. आता पर्यंत जवळपास या कामावर वीस कोटी रुपये खर्च झाले आहेत.

सुनिल पाटील हे या तिन्ही इमारतींचे वास्तूविशारद असून सौरभ कन्स्ट्रक्शन्स हे या इमारतीचे काम करीत आहेत. ही इमारत सर्व सुविधांनी युक्त असून पोलिसांना काम करताना प्रसन्न वातावरण असावे या उद्देशाने रचना करण्यात आली आहे.

गेली अनेक वर्षे बारामतीच्या श्रीमंत बाबूजी नाईक वाड्यातील जुन्या इमारतीत शहर पोलिसांनी काम केले असून आता या वाड्याचे जतन एक ऐतिहासिक वास्तू म्हणून केले जात असल्याने पोलिस ठाण्याची इमारतही नव्याने उभारण्यात आली आहे.

दरम्यान बारामती शहरात बसविण्यात येणा-या विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमे-याचा नियंत्रण कक्षही नव्याने उभारण्यात येत असलेल्या याच इमारतीत असेल. प्रशासकीय भवनासमोरील जागेतच ही इमारत होत असल्याने बाहेरगावाहून विविध शासकीय कामासाठी येणा-या नागरिकांना ही जागा सोयीची पडणार आहे. नवीन बसस्थानकानजिकच ही इमारत असल्याने बसस्थानकातून लोक चालतही या ठिकाणी येऊ शकतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT