उंडवडी, ता. ३१ : डेलोनिक्स सोसायटीच्या बारामती कॉलेज ऑफ फार्मसी, बऱ्हाणपूर (ता. बारामती) येथील विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय क्लिनिकल केस प्रेझेंटेशन स्पर्धेत प्रथम उपविजेतेपद पटकावून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. एस. एन. बी. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, चिखली (पुणे) येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील विविध महाविद्यालयांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
या स्पर्धेत ज्ञानेश्वरी जमदाडे व प्रियांका जाधव यांनी प्रभावी सादरीकरण करत परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी सादर केलेल्या क्लिनिकल केस प्रेझेंटेशनमध्ये रुग्णाची लक्षणे, आजाराची पार्श्वभूमी, निदान, उपचारपद्धती, औषधांची निवड, डोसिंग पद्धती, संभाव्य दुष्परिणाम तसेच रुग्ण समुपदेशन यांचा शास्त्रीय व सुसंगत आढावा मांडला.
विद्यार्थिनींनी फार्मासिस्टची भूमिका, रुग्णसुरक्षा, औषधांचे परस्परसंवाद तसेच उपचारादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीच्या मुद्द्यांवरही प्रकाश टाकला. डेटा-आधारित मांडणी, प्रभावी स्लाईड्स आणि प्रश्नोत्तर सत्रातील अचूक उत्तरे यामुळे त्यांचे सादरीकरण विशेष ठरले.
या यशामागे प्राध्यापिका निकिता वाघमारे व सई ढवाण यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. विभागप्रमुख डॉ. कविता माने यांनी विद्यार्थिनींना प्रेरणा दिली.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थिनी व मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.