पुणे

बारामतीत कोरोनाचा कहर; सिल्व्हर ज्युबिलीतील कॉरीडॉरच झाला वॉर्ड 

सकाळन्यूजनेटवर्क

बारामती : शहरातील कोरोनारुग्णांच्या संख्येने आज नवीनच संकट निर्माण झाले होते. येथील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयासमोर आज जवळपास साठ कोरोनाबाधित रुग्ण बेडस मिळावेत यासाठी ताटकळत होते. एकीकडे हाऊसफुल्ल झालेले सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय आणि दुसरीकडे बाहेर ताटकळत असलेल्या रुग्णांना कसे सामावून घ्यायचे असा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला होता. मात्र सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांच्यासह  उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, सुधीर पानसरे, अभिजित चव्हाण यांच्या टीमने तातडीने हालचाली करुन साठ बेडस, साठ बेडशीट, गाद्या यांची उपलब्धता करुन देत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात तात्पुरता एक नवीन कॉरीडॉरच तयार केला. 

बारामतीतील कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना औषधोपचाराचा खर्च परवडणारा नसल्याने अनेक जण सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. आज रुग्णालयातील सर्वच बेड रुग्णांनी व्यापलेले असताना नवीन अचानकच जवळपास साठ रुग्ण उपचारासाठी विनंती करत असल्याने वैद्यकीय प्रशासनाची कोंडी झाली. ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही मात्र ज्यांना रेमडीसेव्हर इंजेक्शनची गरज आहे, अशा रुग्णांना कसेही करुन तात्पुरती व्यवस्था उभारुन सामावून घेण्याचा निर्णय डॉ. सदानंद काळे, किरण गुजर व  सहका-यांनी घेतला. त्यांनी तातडीने रुग्णालयातील कॉरीडॉरलाच वॉर्डाचे स्वरुप देण्याची तयारी करत हा निर्णय अंमलातही आणला. 

परिस्थिती गंभीर बनू लागली...
रुग्णांची वाढती संख्या आता प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनू लागली आहे. गृहविलगीकरणास परवानगी देण्याची मागणी आता जोर धरु लागली असून यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी आता काही हॉटेल्स देखील अधिग्रहीत करावीत अशी मागणी होत आहे. ज्यांना सरकारी विलगीकरणात राहण्याची इच्छा नाही, त्यांना पुण्यातील रुबी हॉलने ज्या प्रमाणे हॉटेल कपिलामध्ये काही रुग्णांची सोय केली आहे, त्या धर्तीवरच आता बारामतीतही ही सुविधा निर्माण करावी अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नुसतं राहायचं ठिकाण नाही, सलमान खानच्या १५० एकरात असलेल्या फार्महाउसवर होते शेती; काय काय पिकतं माहितीये?

Pune News : शेतकऱ्यांच्या १२ कोटींच्या मोबदल्यावरून महापालिकेची नामुष्की; आयुक्तांची खुर्ची जप्तीची कारवाई टळली

PMC News : पुणे महापालिका भाडेतत्त्वावर घेणार २५० घंटागाड्या; कचरा संकलन व्यवस्था होणार अधिक सक्षम

Flood News : कोरेगाव मुळ बंधाऱ्यावरून दुचाकीसह ज्येष्ठ वाहून; एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू

Pune News : ‘आर्किटेक्ट’ पदवीचा बेकायदेशीर वापर महागात; कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचा कठोर इशारा

SCROLL FOR NEXT