बारामती, ता. ५ : गुणवडी (ता. बारामती) येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीदरम्यान ‘डीजे’च्या मोठ्या आवाजावरून झालेल्या वादातून मारहाण झाल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी सोहम उमेश भोई, अनुराग नीलेश पवार, धीरज संजय मोरे आणि महेश आप्पा वायचंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रवींद्र आण्णा घोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘डीजे’चा आवाज कमी करण्यास सांगितल्याचा राग मनात धरून मारहाण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, फिर्यादीने ‘डीजे’ वाहनासाठी आवश्यक परवानग्या, ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन आणि वाहनातील बदलांची वैधता याची चौकशी करून संबंधित वाहनमालक, चालक, ‘डीजे’ मालक, आयोजक व जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी मोटार वाहन अधिनियम, ध्वनी प्रदूषण नियम तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.