Dr. Satish Pawar sakal
पुणे

Baramati News : बारामतीच्या डॉ. सतीश पवार यांनी केले नवीन संशोधन

महिलांमध्ये स्तनामध्ये होणा-या गाठींचे निदान अत्याधुनिक इलोस्टोग्राफी या सोनोग्राफी तंत्राद्वारेही होऊ शकते.

मिलिंद संगई

बारामती - महिलांमध्ये स्तनामध्ये होणा-या गाठींचे निदान अत्याधुनिक इलोस्टोग्राफी या सोनोग्राफी तंत्राद्वारेही होऊ शकते याचे प्रात्यक्षिकासह सादरीकरण बारामतीचे प्रसिध्द सोनोग्राफी तज्ज्ञ डॉ. सतीश पवार यांनी नुकतेच केले.

ओमानमधील मस्कत येथे नुकत्याच झालेल्या वर्ल्ड फेडरेशन ऑफ अल्ट्रासाऊंड इन मेडिसिन अँड बॉयॉलॉजी या जागतिक परिषदेत डॉ. सतीश पवार यांनी या नवीन विषयातील आपला शोधनिबंध सादर केला.

सीएनजीएम या स्तनात होणा-या गाठींचे निदान सोनोग्राफी तंत्रज्ञानाद्वारे होऊ शकते, ही बाब त्यांनी समोर आणली. बारामतीतील त्यांच्या सोनोग्राफी केंद्रात पंचवीसहून अधिक महिलांच्या अशा प्रकारच्या सोनोग्राफी रिपोर्टसचा अभ्यास केल्यानंतर इलोस्टोग्राफी या तंत्राद्वारे स्तनांमधील गाठींचे निदान करता येऊ शकते ही बाब समोर आली.

या तंत्राद्वारे असे निदान होऊ शकते ही बाब डॉ. सतीश पवार यांनी जागतिक स्तरावर प्रथमच समोर आणल्याने त्यांच्या या शोधनिबंधाचे जागतिक स्तरावर मस्कतमधील परिषदेत कौतुक केले गेले.

या संशोधनाच्या सादरीकरणात डॅा. सतीश पवार यांच्यासोबत डॅा. सम्राज्ञी पवार व डॅा. कीर्ती पवार यांचाही सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Golden Visa confusion: 23 लाखांत मिळतोय लाइफटाइम गोल्डन व्हिसा? युएई सरकारने दिलं स्पष्टीकरण

Goa Crime: पुणेकर पर्यटकाची गोव्यात दादागीरी, गेट बंद केल्याच्या वादातून थेट कारखाली चिरडलं! सुरक्षा रक्षक गंभीर जखमी

Mars Rock Auction : मंगळावरून आलेल्या सर्वात मोठ्या उल्कापिंडाचा लिलाव होणार; किंमत तब्बल ३४ कोटी रुपयांपर्यंत, आश्चर्यकारक फोटो पाहा..

Latest Maharashtra News Live Updates: विदर्भात पावसाचा जोर कायम, पुरामुळे बंद झाले 'हे' मार्ग

Guru Purnima 2025 Remedies: गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी 'हे' उपाय करा, मात लक्ष्मी-नारायणाची तुमच्यावर कायम राहील कृपादृष्टी

SCROLL FOR NEXT