पुणे

बारामतीत राष्ट्रवादीकडून मताधिक्याचे विक्रम

CD

सोमेश्वरनगर, ता. ९ : बारामती तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांना मतदारांनी ‘न भूतो न भविष्यती’ अशा प्रचंड मताधिक्याने विजयी करत राज्यस्तरीय विक्रम नोंदविले. राष्ट्रवादीचे नुसते मताधिक्य १७ ते २१ हजार राहिले. ‘घड्याळावर शिक्का’ हा एकमेव ध्यास घेऊन मतदारांनी मतदान केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना, मनसे यांच्यासह अपक्षांचाही अक्षरशः पालापाचोळा झाला.
अजित पवार यांना कायमच राज्यात विक्रमी मताधिक्याने निवडून आणणाऱ्या मतदारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही राज्यस्तरीय विक्रमांची नोंद केली. अजित पवार यांनीच उमेदवारी यादी निश्चित केली होती. त्यांच्या अचानक जाण्यानंतर दुःखद वातावरण असताना प्रचार साधेपणाने केल्याने मतदानाचा टक्का घटला होता. मात्र, जे झाले त्यात बहुतेक ठिकाणी नव्वद टक्के मतदान राष्ट्रवादीला झाले. त्यामुळे बारामतीत फक्त मताधिक्याचीच चर्चा होती. जिल्हा परिषदेवर दादांची सत्ता आणायची, या हेतूने दिलेले हे प्रचंड मताधिक्य अजित पवार यांना जणू विनम्र अभिवादन करणारे असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

झेडपीत रोहिणी कदम यांचा विक्रम
तालुक्यात जिल्हा परिषदेला रोहिणी कदम यांना २२ हजार ५७२, तर पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे यांना २२ हजार १८१ इतकी विक्रमी मते मिळाली. पुणे जिल्हा परिषदेत संभाजी होळकर यांचा १६ हजारांचा, तर रोहित पवार यांचा १८ हजारांचा मताधिक्याचा विक्रम होता. आता मोरगाव गटात रोहिणी कदम तब्बल २१५३६ मतांनी, नीरावागज गटात शिवानी देवकाते यांनी २०५४४ मतांनी; तर निंबुत गटात करण खलाटे तब्बल १९ हजार ५२४ मतांनी विजय नोंदविला आहे. विरोधकांपैकी मोहिनी खैरे ३५४२ व मनीषा चांदगुडे यांची ४७७७ मते सर्वाधिक ठरली. भाजप, शिवसेना, बसप, वंचित, काँग्रेस, मनसे, रासप अशा कुणालाही मतदारांनी थारा दिला नाही. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष पी. के. जगताप, शिवसेनेचे तालुकाप्रमुख स्वप्नील जगताप, विक्रम कोकरे, मच्छिंद्र तावरे, सूरज जगताप, कल्याणी वाघमोडे आदी चर्चेतल्या उमेदवारांचा मोठा पराभव झाला.

पंचायत समितीत वायाळ यांचे यश
पंचायत समितीला कांबळेश्वर गणात आशाबाई वायाळ यांनी ११,६३४ मतांनी, मोरगाव गणात रावसाहेब चोरमले यांनी १०,८३३ मतांनी, नीरावागज गणात नितीन काकडे यांनी १०,४९० मतांनी विजय नोंदविले. याशिवाय राजश्री टकले यांनी ९९३६ मतांनी, जितेंद्र पवार या तरूणाने ९८८० मतांनी, मुढाळे गणाच्या वैशाली कोकणे यांनी ९२२९ मतांनी विजय नोंदविले. जिथे चुरशीची लढत आहे असा भ्रम पसरवला गेला होता तिथेही दिग्विजय जगताप यांनी ६९२० मतांनी; तर किरण तावरे यांनी ६२७० मतांनी एकतर्फी विजय प्राप्त केला.

दोन जागांवर कमळ फुलले
अजित पवार यांच्याच आशीर्वादाने पंचायत समितीच्या दोन जागांवर सन १९९७नंतर प्रथमच ‘कमळ’ फुलले. बारामतीत सन १९९७मध्ये तीन जागांवर कमळ फुलले होते. त्यानंतर आता अजित पवार यांनी उज्ज्वला खैरे व अनिकेत गावडे या भाजपच्या दोन उमेदवारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साथ दिल्याने २८ वर्षांनी या दोन जागांवर कमळ फुलले आहे. तिथे राष्ट्रवादीने उमेदवार दिले नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : कारच्या एअरबॅगचा ब्लास्ट, चालक तरुणाचा मृत्यू

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २७ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

निवडणुकीतील पराभवानंतर विरोधकांमध्ये फूट! मोठ्या पक्षाने ९ वर्षांची साथ सोडत युती तोडली; राजकीय गणित बिघडले

SCROLL FOR NEXT