माळेगाव, ता. २४ : बारामती तालुक्यातील विविध भागांत गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वाढता वावर आणि हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, या मागणीसाठी खांडज, शिरवली, घाडगेवाडी आदी गावांतील गावकऱ्यांनी सोमवारी (ता. २४) बिबट्याच्या प्रतिकृतीसह प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले.
‘गेल्या आठ महिन्यांपासून बिबट्याचे हल्ले’, ‘बिबट्याने बाळांवर हल्ला करण्याआधी जागे व्हा’, तसेच ‘देवा भाऊ, आम्हाला बिबट्यापासून वाचवा’, अशा आशयाचे फलक आंदोलनस्थळी लावण्यात आले होते. बिबट्याच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून नागरिकांच्या मनातील भीती आणि संताप व्यक्त करण्यात आला. बिबट्यांचा वावर वाढलेल्या परिसरात वनविभागाने तातडीने पिंजरे लावावेत, नियमित गस्त वाढवावी, बिबट्यांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मिथुन आटोळे आदी आंदोलकांनी केली.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
खांडज परिसरातील मुले, महिला, शेतकरी आणि रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्यानंतरच उपाययोजना करण्याऐवजी संभाव्य धोका असलेल्या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. वनविभागाने नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलनातून केली.
03305
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.