

India Hockey Team
Sakal
Hockey World Cup 2026, India vs Argentina : हॉकी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील भारतीय पुरुष संघाचे आव्हान सोमवारी (२४ ऑगस्ट) संपले. सोमवारी दुसऱ्या फेरीतील भारताचा अखेरचा साखळी सामना अर्जेंटिनाविरुद्ध झाला. हा सामना भारतासाठी 'करो वा मरो' असा होता.
या सामन्यात भारताला किमान २ गोलचा फरक ठेवून जिंकणे गरजेचे होते. मात्र हा सामना भारताने ५-३ अशा फरकाने गमावला. हा सामना हरल्याने आता भारतीय संघ क्लासिफिकेशन फेरीत खेळेल, पण आता विजयाचे स्वप्न मात्र भंगले आहे.