पुणे

विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा

CD

बारामती, ता. १७ : लग्नानंतर मानसिक व शारीरिक छळ करून विवाहितेला माहेरी पाठवून दिल्याप्रकरणी पती, सासू व दीराविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत गुलजार मोहंमदअली कुरेशी (वय ३१, रा. बारामती, मूळ रा. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा विवाह 2021 मध्ये मोहंमदअली सलीम कुरेशी याच्याशी झाला होता.
फिर्यादीतील माहितीनुसार, विवाहानंतर सासू आसमा सलीम कुरेशी व दीर शादाब सलीम कुरेशी यांनी सतत मानसिक त्रास देत अपमानास्पद वागणूक दिली. “तू आमच्या मुलाला शोभत नाहीस” अशा शब्दांत टोमणे मारले जात होते. तसेच पतीदेखील योग्य वागत नसल्याचे नमूद केले आहे.
डिसेंबर २०२२मध्ये फिर्यादी महिलेला इच्छेविरुद्ध माहेरी बारामती येथे सोडण्यात आले. त्यानंतर अनेक वेळा नातेवाईकांनी समेटाचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी तिला नांदविण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मोहंमदअली सलीम कुरेशी, आसमा सलीम कुरेशी व शादाब सलीम कुरेशी, सर्व रा. सातारा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT