पुणे

बारामतीत कडक निर्बंध, सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंतच व्यवहार सुरु

मिलिंद संगई

बारामती -  शहर व तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून बारामतीत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच व्यवहार सुरु असतील, अशी माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. बारामती शहर व तालुक्याला हा नियम लागू असेल. मॉल, हॉटेल, फूडकोर्ट, रेस्टॉरंट, बार, चित्रपटगृह, नाट्यगृह, स्विमींगपूल, स्पा, जिम हे पुढील सात दिवस बंद असतील.  सर्व आठवडे बाजारही या काळात बंद असतील. 

दरम्यान बारामती शहर व तालुक्यात सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत जमावबंदी तर संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ पर्यंत संचारबंदी असेल, असेही दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. दूध, भाजीपाला, फळे, वृत्तपत्र सेवेसह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणा-या पुरवठादारांसह हॉटेल पार्सल सेवेच्या व्यक्तींनाही यातून सूट देण्यात आली आहे. कोविड लसीकरणासाठी जाणा-यांनाही सूट दिली जाईल. 

सर्व कारखाने व आस्थापनांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कर्मचा-यांची आरटीपीसीआर तपासणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, समारंभांना परवानगी दिली जाणार नाही. दहावी बारावीच्या नियोजित परिक्षा वगळता सर्व शाळा व महाविद्यालयांचे कामकाज येत्या 30 एप्रिलपर्यंत बंद असेल. शासकीय नियमावलीचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाई पोलिस करतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

जिल्हाधिका-यांनी पुणे जिल्ह्यात जरी संध्याकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंतचा आदेश काढलेला असला तरी बारामतीतील कोरोनाग्रस्तांची वाढलेली संख्या विचारात घेता बारामतीत मात्र सकाळी नऊ पर्यंत संचारबंदी करण्यात आलेली आहे. बारामतीत आता संध्याकाळी सात ऐवजी सहा वाजताच दुकाने बंद करावी लागणार आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: गौतमी पाटीलने घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT