बारामती, ता. २४ : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजातील त्रुटींची दखल घेत, राज्य शासनाने अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अचानक केलेल्या पाहणीत नाराजी व्यक्त केल्यानंतर ही मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.
डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची रत्नागिरी येथे बदली करण्यात आली असून, शरीरशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. अंजली पाटील यांच्याकडे अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. शल्यचिकित्साशास्त्र विभागाच्या प्रा. मंजुषा लिटके यांची पुण्याच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये बदली झाली असून, त्यांच्या जागी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. किरणकुमार जाधव यांची नियुक्ती झाली आहे. तसेच, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे यांची अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली होती. या वेळी रुग्णसेवेतील त्रुटींबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या भेटीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेतली. रुग्णसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातल्याने, आगामी काळात महाविद्यालयाच्या कामकाजात सुधारणा होईल, अशी अपेक्षा रुग्ण व नातेवाइकांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.