Baramati News
Baramati News sakal
पुणे

Baramati News: दौंडमध्ये सुळे पवारांचा जोरदार प्रचार; 'पाल्म संडे' ठरला मुहूर्त

प्रफुल्ल भंडारी

Daund: ख्रिस्ती बांधवांच्या झावळ्याचा रविवार ( पाल्म संडे ) या उत्सवानिमित्त ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील दोन संभाव्य महिला उमेदवार दौंड शहरात आले होते.

संभाव्य उमेदवार तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या नणंद तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतंत्ररित्या दौंड शहरातील ख्रिस्ती बांधवांच्या या निमित्त गाठीभेटी घेत शुभेच्छा दिल्या.

प्रभू येशू ख्रिस्त यांचा जेरूसलेम मधील प्रवेशाचा जयोत्सव तेथील नागरिकांनी हातात खजुराच्या झावळ्या घेत केला होता. त्या जयोत्सवाचे स्मरण करून पवित्र सप्ताह साजरा करण्यासाठी गुड फ्रायडे अगोदरील रविवार हा झावळ्याचा रविवार ( पाल्म संडे ) म्हणून साजरा केला जातो.

पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात आज दरवर्षीप्रमाणे ख्रिस्ती बांधवांनी झावळ्याचा रविवार निमित्त सवाद्य प्रभातफेरी काढून प्रभू येशू ख्रिस्त यांचा जयघोष केला. झावळ्या हातात घेऊन ' होसन्ना, होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो ! ' असा जयघोष करण्यात आला. मोठ्या संख्येने जमलेल्या ख्रिस्ती मतदारांना शुभेच्छा देण्यासाठी संभाव्य उमेदवार सुनेत्रा अजित पवार व त्यांच्या नणंद तथा खासदार सुप्रिया सुळे या दौंड शहरात आल्या होत्या.

दौंड पोलिस ठाण्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( शरदचंद्र पवार गट ) खासदार सुप्रिया सुळे यांनी हातात झावळयाची फांदी धरून ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या. प्रभातफेरीतील मुली, महिला व पुरूषांनी या वेळी सुप्रिया सुळे यांच्यासमवेत छायाचित्र काढले.

दौंड एसटी बस थांब्याशेजारील चर्च ऑफ ख्राईस्ट येथे प्रभातफेरीचा समारोप होण्यापू्र्वी संभाव्य उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी अॅशवूड मेमोरियल हॅास्पिटलच्या प्रांगणात ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या. या वेळी पास्टर बेंजामिन तिवारी यांनी केलेल्या प्रार्थनासभेत त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( अजित पवार गट ) पदाधिकारी सहभागी झाले होते. ब्रिटिशकालीन सेंट सेबॅस्टियन चर्च येथे सुनेत्रा पवार यांनी भेट देत रोमन कॅथलिक व अन्य ख्रिस्ती बांधवांना पाल्म संडेच्या समक्ष शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT