Sharad Pawar esakal
पुणे

बारामती : पाडव्याला शरद पवार गोविंदबागेत सर्वांना भेटणार

दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला भेटीची ज्येष्ठ नेते शरद पवार यांची परंपरा यंदा पुन्हा सुरु होणार आहे.

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला भेटीची ज्येष्ठ नेते शरद पवार यांची परंपरा यंदा पुन्हा सुरु होणार आहे. सर्व शासकीय नियमांचे पालन करुन, सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच आपण लोकांना भेटणार असल्याचे शरद पवार यांनी आज नमूद केले.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या पाडव्याला पवार कुटुंबिय लोकांना भेटले नव्हते. गोविंदबाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह पार्थ पवार, जय पवार हेही बारामतीसह राज्यभरातून येणा-यांच्या गाठीभेटी घेतात.

गेल्या अनेक वर्षांपासून पाडव्याच्या दिवशी शरद पवार यांना भेटण्यासाठी खासदार, आमदार, मंत्री, पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते हजेरी लावतात. राजकारणासह सहकार, कृषी, क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक, विज्ञान अशा विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी जातीने येतात. दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना देण्यासाठी गोविंदबागेत अनेकांच्या गाठीभेटी होत असल्याने बारामतीसह आसपासच्या तालुक्यांसह जिल्ह्यातून लोक पाडव्याच्या दिवशी गर्दी करतात.

दोन वर्षांपासून खंडीत झालेली ही परंपरा आता कोरोनाची परिस्थिती सुधारलेली असल्याने यंदा पुन्हा सुरु होणार आहे. आपण सर्व शासकीय नियमांचे पालन करुन, सोशल डिस्टन्सिंग ठेवून लोकांना भेटणार असल्याचे पवार यांनी नमूद केले आहे. यंदाची दिवाळी दोन वर्षानंतर बारामतीकरांसाठी नेहमीप्रमाणेच होणार असल्याने नागरिकांतही उत्साहाचे वातावरण आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांचा बारामती दौरा, शारदोत्सवाचा कार्यक्रम असल्याने व कोरोनाचे संकट आता धूसर झाल्याने बाजारपेठेतही यंदा कमालीचा उत्साह आहे. लोकही आनंदाने दिवाळीची तयारी करताना बारामतीत दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT