Goggle and Watch sakal
पुणे

Baramati News : आता चष्मे, गॉगल, घड्याळेही मिळतील सुलभ हप्त्यांवर

काळ बदलतो तशी अनेक समीकरणेही बदलतात अस म्हटल जात, तसच बदलत्या काळानुसार बाजारपेठेतही अनेक बदल घडतात.

मिलिंद संगई

बारामती - काळ बदलतो तशी अनेक समीकरणेही बदलतात अस म्हटल जात, तसच बदलत्या काळानुसार बाजारपेठेतही अनेक बदल घडतात, अनेक बदल हे आश्चर्यकारकच म्हणावे लागतील असे असतात.

इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, मोबाईलप्रमाणेच आता चष्मे, गॉगल, घड्याळ, ट्रॅव्हल बँग, वाहनांच्या अँक्सेसरीज, वाहनांचे टायर यांनाही वित्तीय अर्थसहाय्याच्या योजना सुरु झाल्यामुळे ब्रँडेड गॉगलपासून घड्याळापर्यंत खरेदीस लोकांनी प्रारंभ केला आहे.

सुलभ हप्त्यांची पध्दत रुढ झाल्यानंतर सामान्यांनीही अगदी सहजतेने आपल्या घरात टीव्ही, रेफ्रिजेटर, वॉशिंग मशीन, एअर कंडीशनरसह चार व दुचाकी वाहने आणली. एकदम रक्कम भरण्याचे टेंशन नसल्याने लाख दीड लाखांचे मोबाईलही लोक सहजतेने घेऊ लागले.

ब्रँडेड वस्तूंचे आकर्षण सामान्यांनाही वाटू लागल्यानंतर ही बाजारपेठ काबिज करण्यासाठी वित्तीय सहाय्याच्या योजना सुरु झाल्या आणि पाहता पाहता प्रत्येकाकडूनच सुलभ हप्त्यांवर वस्तूंची सहजतेने खरेदी सुरु झाली.

नोकरदारांना तर ही पर्वणीच होती. एकदम रक्कम भरता येत नसल्याने इच्छा असूनही वस्तूंची खरेदी शक्य होत नव्हती. या योजनांमुळे हवी ती वस्तू खरेदी करणे सोपे बनले. पर्यायाने या वस्तूंची बाजारपेठ बहरली.

हल्ली ब्रँडेड गॉगल्स, चष्मे व घड्यांळांचीही तरुणाईत मोठी क्रेझ आहे. प्रत्येकाकडेच या वस्तू असतातच. त्यातही ब्रँडेड वस्तू असाव्यात अशी अनेकांची इच्छा असते पण एकदम इतकी भारी वस्तू खरेदी करणे अनेकांना शक्य होत नाही ही बाब विचारात घेत एका वित्तीय कंपनीने या वस्तूंसाठी तीन ते बारा महिन्यांपर्यंत सुलभ हप्त्याची सुविधा सुरु केली आहे.

कोणत्याही कागदपत्रांची गरज नसल्याने व तातडीने अर्थसहाय्य उपलब्ध होत असल्याने ही योजना लोकप्रिय होऊ लागली आहे. दुकानादारालाही या योजनेद्वारे ग्राहकांना अर्थसहाय्य देऊन वस्तू विक्रीची सुविधा दिल्याने ग्राहकांची मोठीच सोय झाली आहे. या साठी अर्थातच काही अटी व शर्ती लागू असल्या तरी गॉगल, चष्मे किंवा घड्याळे सुलभ हप्त्यांवर मिळू लागल्याने आता लोकांना या ब्रँडेड वस्तू खरेदी करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा पुन्हा दणका! थेट BMC मुख्यालयातील कॅन्टीन सील; राज्यभर कारवायांचा धडाका

Commonwealth Games 2026: जय हो! राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनचं पदक पक्कं झालं; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : 'युवकांच्या भविष्यासाठी राजकारण नको; चर्चेत अडथळे आणू नका', सर्व पक्षांना किरेन रिजिजू यांचे आवाहन

Solapur News: मंगळवेढ्यात वंचित बहुजन आघाडीचा बंद; दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील पोलिस कारवाईचा निषेध

IND vs ZIM 1st T20I : पहिल्या सामन्यापूर्वीच धक्का, फलंदाजाची दुखापतीमुळे माघार, बोर्डाने जाहीर केली रिप्लेसमेंट... नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT