पुणे

बारामती - म.ए.सो.विद्यालयानजिकच्या वडाच्या झाडाचे यशस्वी पुर्नरोपण

मिलिंद संगई

बारामती - शहरातील भिगवण रस्त्यावरील म.ए.सो. विद्यालयानजिकच्या वडाच्या झाडाचे आज एमआयडीसीतील चिंकारा वनउद्यानामध्ये यशस्वी पुर्नरोपण करण्यात आले. या झाडाच्या आठवणी या मुळे आता कायमस्वरुपी जागृत राहणार आहेत.

बारामतीतील भिगवण रस्त्याला समांतर सेवा रस्त्याच्या कामामध्ये म.ए.सो.विद्यालयानजिक असलेले अत्यंत पुरातन वडाचे झाड अडथळा ठरत असल्याने हे झाड तोडण्याचा निर्णय झाला होता. मात्र या झाडाचे पुर्नरोपण करावे अशी मागणी जोर धरत होती. 

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार गटनेते सचिन सातव, नगरसेवक सत्यव्रत काळे यांनी आज सकाळपासूनच रविराज लाखे, अमोल संजय भिंगारे, उमेश भिंगारे यांच्या मदतीने अवाढव्य क्रेन, मोठा ट्रक ट्रेलर लावून या झाडाचे खोड भिगवण रस्त्यापासून उचलून एमआयडीसीतील चिंकारा वनउद्यानात आणून व्यवस्थित खड्डा घेऊन त्याचे पुर्नरोपण केले. 

या मुळे या झाडाच्या आठवणी आता कायमस्वरुपी राहणार आहेत, या झाडासोबत अनेक बारामतीकरांच्या जुन्या आठवणी जोडलेल्या होत्या, त्या जतन करण्यात या कामाने मदत होणार आहे. 

आज झालेल्या या कामामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी जी.ए. सुपेकर, वनपाल टी.जे. जराड, गणेश रणवरे, पी.ए.भगत, प्रकाश लोंढे, डी.एम. वाघमोरे यांच्यासह बारामती नगरपालिका उद्यानाचे मज्जीद पठाण, मिलिंद भिसे, दत्तात्रय खलाटे, अंबादास देवकाते, कुणाल अडागळे, दिलीप गावडे, ऋषीकेश शिंदे, पंकज पवार, रमेश वाघचौडे, अमोल शेळके, अजय खरात, निशिगंध जगताप यांच्यासह मल्लिकार्जुन हिरेमठ यांनी या कामामध्ये सक्रीय सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT